-
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा यावर्षी २६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्रीचं सासर हे नाशिकला आहे. कारण तितीक्षा मूळची कोकणातली असून सिद्धार्थ हा नाशिकचा आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या आई-बाबांनी नाशिकमध्ये सुंदर असं घर खरेदी केलं आहे. तितीक्षा सासरच्या मंडळींसह दिवाळीच्या मुहूर्तावर या आलिशान घरात शिफ्ट झाली.
-
तितीक्षाने युट्यूब व्हिडीओ शेअर करत तिच्या सासरच्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
-
घरात एन्ट्री घेतल्यावर प्रशस्त हॉल आणि त्याला लागून असलेली मोठी बाल्कनी सर्वांचं लक्ष वेधून घेते.
-
याशिवाय तितीक्षा-सिद्धार्थच्या या नव्या घरातून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. या गॅलरीतून गोदावरी नदी व संपूर्ण नाशिक शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो असं अभिनेत्रीने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं.
-
सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोडके कुटुंबीयांनी घराच्या दारावर आकर्षक नेमप्लेट लावली आहे.
-
बोडके असं आडनाव मोठ्या अक्षरात लिहून त्याखालोखाल संदीप ( अभिनेत्रीचे सासरे), पल्लवी ( अभिनेत्रीची सासू ), सिद्धार्थ तितीक्षा अशी नावं लिहिलेली नेमप्लेट त्यांनी नव्या घराच्या दाराबाहेर लावली आहे. या सुंदर नेमप्लेटचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
-
तितीक्षा व सिद्धार्थ यांनी या सुंदर घराचं श्रेय त्यांच्या आई-बाबांना ( तितीक्षाचे सासू-सासरे) दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम व युट्यूब व्हिडीओ )
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
तितीक्षा तावडेचं सासरचं घर आहे खूपच सुंदर! दारावर लावलीये हटके नेमप्लेट, फोटो एकदा पाहाच
Web Title: Titeeksha tawde new home in nashik of her in laws beautiful name plate grabs attention sva 00