• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sikandar chhaava raja sahab emergency sitare jamin par 10 most awaited indian movies of 2025 upcoming films 2025 spl

छावा, सिकंदर ते अल्फा; २०२५ मध्ये ‘हे’ १० बहुप्रतिक्षित धमाकेदार सिनेमे चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

२०२५ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, परंतु या १० चित्रपटांच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated: December 26, 2024 15:05 IST
Follow Us
  • varun dhawan janhvi kapoor sunny sanskar ki tulsi kumari
    1/10

    सनी संस्कार की तुलसी कुमारी
    ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’मध्ये जान्हवी कपूर, वरुण धवन, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत असून हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 2/10

    राजा साहब
    दिग्दर्शक मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘राजा साहब’ चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 3/10

    कांतारा: चाप्टर १
    ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर १’ हा २ ऑक्टोबर २०२५ रोजी सात भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

  • 4/10

    सितारे जमीन पर
    आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट २०२५ मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल. हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. असे असले तरी ‘तारे जमीन पर’ मधील पात्रे ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार नाहीत.

  • 5/10

    ठग लाइफ
    कमल हसनचा ‘ठग लाइफ’ ५ जून २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये गँगस्टर ड्रामा दाखावला जाणार असल्याची माहिती आहे. ‘ठग लाईफ’चे दिग्दर्शन मणिरत्नम करत आहेत.

  • 6/10

    इमर्जन्सी
    कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट २०२४ साली रिलीज होणार होता. मात्र, सीबीएफसीकडून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात येऊ शकला नाही. पण आता हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.

  • 7/10

    गेम चेंजर
    कियारा अडवाणी आणि राम चरण यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गेम चेंजर’ २०२५ मध्ये १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • 8/10

    छावा
    विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असून या चित्रपटात रश्मिका मंदाना देखील दिसणार आहेत.

  • 9/10

    सिकंदर
    ‘बेबी जॉन’नंतर सलमान खान आता ॲक्शन एंटरटेनर ‘सिकंदर’मध्ये दिसणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित आणि एआर मुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानबरोबर रश्मिका मंदानाही दिसणार आहे.

  • 10/10

    अल्फा
    यशराज फिल्म्सचा पुढील स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘अल्फा’ २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिव रवैल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
    हेही पाहा- कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sikandar chhaava raja sahab emergency sitare jamin par 10 most awaited indian movies of 2025 upcoming films 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.