-
अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या मालिका आणि त्यांतील पात्रांसाठी घराघरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नाही तर या शोमधून त्या मोठी कमाईही करतात. आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत.
-
हिना खान
हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली. अनेक वर्षे या मालिकेत काम केल्यानंतर हिना घराघरात प्रसिद्ध झाली. यानंतर हिनाने बिग बॉस, खतरों के खिलाडी, कसौटी जिंदगी की सारख्या शोमध्येही काम केले आहे. IMDB च्या रिपोर्टनुसार हिनाची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये आहे. -
सरगुन मेहता
सरगुन मेहताने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली होती, त्यानंतर ती पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आहे. आता ती निर्मातीही झाली आहे. IMDb च्या रिपोर्टनुसार, सरगुनची एकूण संपत्ती ८२ कोटी आहे. -
श्वेता तिवारी
IMDB नुसार श्वेता तिवारीची एकूण संपत्ती ८१ कोटी रुपये आहे. -
निया शर्मा
रिपोर्ट्सनुसार, निया शर्माची एकूण संपत्ती ७०-७५ कोटी रुपये आहे. -
जेनिफर विंगेट
जेनिफर विंगेट ही टीव्हीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. IMDB च्या अहवालानुसार तिची एकूण संपत्ती ४५-५८ कोटी रुपये आहे. -
करिश्मा तन्ना
करिश्मा तन्नाने टीव्हीशिवाय चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. अहवालानुसार तिची एकूण संपत्ती ४९ कोटी रुपये आहे. -
श्रद्धा आर्या
श्रद्धा आर्या नुकतीच २ मुलांची आई झाली आहे. अहवालानुसार तिची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे. -
दिव्यांका त्रिपाठी
‘ये है मोहब्बतें’ या शोमधून लोकप्रिय झालेल्या दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे. -
शिवांगी जोशी
ये रिश्ता क्या कहलाता है स्टार शिवांगी जोशीची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये आहे. -
सायंतानी घोष
कुमकुम, घर एक सपना आणि नागिन सारखे शो करणारी अभिनेत्री सायंतानी घोष या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती ३७ कोटी रूपये आहे.
हिना खान, श्वेता तिवारी ते दिव्यांका त्रिपाठी; छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रींकडे किती आहे संपत्ती? IMDb च्या यादीमध्ये ‘ही’ अभिनेत्री सर्वात श्रीमंत
आज आपण IMDb ने जारी केलेल्या टॉप १० सर्वात श्रीमंत भारतीय टीव्ही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात. या यादीत तुमची आवडती अभिनेत्री आहे का? पाहा…
Web Title: Top 10 richest indian television actresses imdb list hina khan shweta tiwari divyanka tripathi net worth spl