-
या अभिनेत्रीने ९० च्या दशकात आपल्या सुंदर लूकने लोकांची मने जिंकली होती. तिचा जन्म महाराष्ट्रातील पनवेल येथे झाला आणि तिने एमबीबीएस पदवी घेतली. शिक्षणापासून ते लग्न आणि धर्म बदलण्यापर्यंत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात बरेच काही पाहिले. पहिल्या मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर बद्दल जाणून घेऊयात.
-
अभिनेत्रीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि त्या काळातील सुपरमॉडेल म्हणून ओळखली मिळवली.
-
वर्ष २००१ मध्ये तिने मिसेस वर्ल्ड हा खिताब जिंकला आणि हा खिताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. दरम्यान, तिचे वैयक्तिक जीवन मात्र नेहमीच अडचणींनी भरलेले राहिले.
-
‘ब्युटी विथ ब्रेन’साठी प्रसिद्ध असलेली अदिती गोवित्रीकर ‘कभी तो नजर मिलाओ’ या गाण्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री-मॉडेल तिच्या कॉलेजमधील सिनियर मुफजल लकडावालाच्या प्रेमात पडली. दोघे एकमेकांना सहा वर्षे डेट करत होते.
-
१९९७ मध्ये, आदितीने तिच्या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेत्रीचे आई-वडील लग्नाला विरोध करत होते कारण ते वेगवेगळ्या धर्माचे होते. मात्र, दोघांनीही आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले.
-
बॉलिवूडशादीच्या रिपोर्टनुसार, अदिती आणि मुफज्जलने १९९८ मध्ये नागरी आणि मुस्लिम कायद्यानुसार लग्न केले होते. लग्नानंतर आदिती गोवित्रीकरने इस्लाम धर्मही स्वीकारला आणि तिचे नाव बदलून सारा लकडावाला ठेवले.
-
त्यांचे अनेक वर्षे सुखी वैवाहिक जीवन सुरू होते आणि त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले होती. मात्र, मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या. त्यावेळी दोघांमध्ये अनेकदा मारामारी झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या आणि त्याचमुळे ते वेगळे झाले.
-
यादरम्यान एके दिवशी, अनेक वाहिन्यांनी बातमी दिली की मुफज्जल ऑस्ट्रेलियाला निघून गेला आहे आणि अभिनेत्री मुलांसह तिच्या पालकांच्या घरी परत गेली आहे.
-
आदिती गोवित्रीकर आणि मुफजल लकडावाला २००८ मध्ये वेगळे झाले. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल भाष्य केले होते.
-
ती म्हणाली, “मला माझे लग्न वाचवता आले नाही ही माझ्या जीवनातील सर्वात वाईट गोष्ट होती. मला नेहमी जिंकायला आवडते पण यावेळी मला हार मानावी लागली. हे सर्व सहन करणं मला खूप कठीण होते. मला असं वारंवार वाटायचं की हे माझ्याचसोबत का झालं असेल” (सर्व फोटो साभार – अदिती गोवित्रीकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : लाल बिकिनीत निक्की तांबोळीचे अरबाज पटेलबरोबर सेल्फी, दुबईतील व्हेकेशन फोटो व्हायरल
धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
इंडस्ट्रीतील पहिली मिसेस वर्ल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्री अदिती गोवित्रीकर यांनी खूप नाव कमावले पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारदेखील आले. अदितीने दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर तिचे नावही बदलले पण तरीही तिचे नाते टिकू शकले नाही.
Web Title: Aditi govitrikar he first mrs world who converted into islam husband left with kids what did the actress say about her personal life spl