Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan veer mehra crowned bigg boss 18 interesting things about him spl

Bigg Boss 18 चा विजेता करणवीर मेहराचं शिक्षण ते नावातील बदल, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या…

karan veer mehra bigg boss 18 winner: करणवीर मेहराने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Updated: January 20, 2025 10:43 IST
Follow Us
  • Karan veer Mehra Bigg Boss Winner
    1/9

    टीव्हीवरील बहुचर्चित रिॲलिटी शो बिग बॉस सीझन १८ चा अखेर विजेता ठरला. ६ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या शोचा १९ जानेवारी २०२५ रोजी ग्रँड फिनाले झाला. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 2/9

    शोमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्यानंतर काही वाइल्ड कार्ड स्पर्धकही आले. या सीझनमध्ये एकूण २३ स्पर्धकांमध्ये स्पर्धा होती, ज्यामध्ये करण आघाडीवर राहिला आणि त्याने शोची ट्रॉफी जिंकली आहे. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 3/9

    रजत दलालला रिकाम्या हाताने परतावे लागले
    ग्रँड फिनालेमध्ये करणची स्पर्धा विवियन, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम यांच्याशी होती. आधी चुम आऊट झाला, मग अविनाश आणि मग रजत दलालही शोमधून बाहेर पडला. मात्र, या शोचा विजेता रजत दलाल असेल, असे सर्वांना वाटत होते. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 4/9

    शेवटी त्यांच्यामध्ये स्पर्धा झाली
    यानंतर विवियन आणि करण टॉप २ मध्ये राहिले पण शेवटी जनतेने करणवीर मेहराला जास्तीत जास्त मते दिली आणि त्याला बिग बॉस १८ चा विजेता बनवले. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 5/9

    इतकी बक्षीस रक्कम मिळाली
    बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा याला ट्रॉफीसह ५० लाख रुपयांचे विजेते बक्षीस मिळाले. आता जाणून घेऊया करणवीर मेहराबद्दल काही गोष्टी. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 6/9

    यामध्ये देखील विजेता झाला आहे
    बिग बॉस १८ च्या आधी करणवीर मेहराने ‘खतरों के खिलाडी १४’ची ट्रॉफीही जिंकली होती. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 7/9

    नाव का बदलले?
    करणवीर मेहरा यांचे पूर्वीचे नाव करण मेहरा होते. त्याच्या आजीने त्याला करणसमोर ‘वीर’ जोडण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने आपले नाव बदलून करणवीर मेहरा ठेवले. वीर हे त्याच्या आजोबांचे नाव होते. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 8/9

    करण किती शिक्षित आहे?
    दिल्लीत जन्मलेल्या करणवीर मेहराने मसुरी येथील वेनबर्ग ॲलन स्कूल या बोर्डिंग स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून ११वी आणि १२वीचे शिक्षण पूर्ण केले. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी)

  • 9/9

    करणवीर मेहराने दिल्ली विद्यापीठाच्या दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून ॲडव्हर्टायझिंग आणि सेल्स प्रमोशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. (फोटो: करण वीर मेहरा/एफबी) हेही पाहा- ‘या’ 10 भारतीय चित्रपटांनी चीनी नागरिकांना लावलं वेड; केली रेकॉर्डब्रेक कमाई, आमिर खानच्या ‘दंगल’ने…

TOPICS
बिग बॉसBigg BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Karan veer mehra crowned bigg boss 18 interesting things about him spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.