-
तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्याजागी या मालिकेत आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ता कोळी हे पात्र साकारत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता कोळीचा पती सागर कोळी ही व्यक्तिरेखा अभिनेता राज हंचनाळे साकारत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे राजचा सुद्धा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत राणादाचा भाऊ सूरज ( सन्नी दा ) ही भूमिका साकारली होती.
-
छोट्या पडद्यामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या राज हंचनाळेच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला तुम्ही पाहिलं आहेत का? या जोडप्याबद्दल जाणून घेऊयात…
-
राज हंचनाळे वैयक्तिक आयुष्यात २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकला.
-
राजने २०१९ मध्ये मनिषा म्हणजे मॉली डेस्वालशी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लव्हमॅरेज असून, लग्नाआधी सहा वर्षे हे दोघंही एकमेकांना ओळखत होते.
-
राज हंचनाळे मराठी कलाविश्वात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. तर, मॉली ही हरियाणाची आहे. दोघंही एकमेकांना २०१३ पासून ओळखत होते.
-
मॉली ही स्केच आर्टिस्ट आहे. तिने काढलेली सुंदर चित्रे व स्केच ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
राज आणि मॉलीच्या फोटोंवर नेटकरी कायमच लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : Manisha Deswal/ raj hanchanale इन्स्टाग्राम )
‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील राज हंचनाळेच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? दोघांची जोडी दिसते खूपच सुंदर
Web Title: Premachi goshta fame raj hanchanale real life wife manisha deswal see their romantic photos sva 00