-
सैफ अली खानला ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात तो घरी पोहोचला. (फोटो: पीटीआय)
-
दरम्यान, या घटनेनंतर सैफ अली खानने त्याची सुरक्षा टीम बदलल्याचीही बातमी आहे. आता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेत्याच्या हाती असणार आहे. (फोटो: पीटीआय)
-
खरं तर, तो दुसरा कोणी नसून रोनित रॉय आहे. जो सैफ अली खानची सुरक्षा करेल. सैफ अली खाननेही त्याला हे काम दिले असल्याचे बोलले जात आहे. (फोटो: रोनित बोस रॉय/इन्स्टा)
-
रोनित रॉय ‘एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन’ नावाची संस्था चालवतो ज्यामध्ये तो सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम करतो. (फोटो: रोनित बोस रॉय/इन्स्टा)
-
रोनित रॉयचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये तो म्हणतो, ‘आम्ही सैफसोबत आधीपासूनच आहोत. तो आता ठीक आहे आणि परत आला आहे. मात्र, रोनित रॉय किंवा सैफ अली खान यांनी सुरक्षा पुरवण्याबाबत काहीही अधिकृतपणे सांगितलेले नाही. (फोटो: रोनित बोस रॉय/इन्स्टा)
-
रोनित रॉय त्याच्या सुरक्षा एजन्सी अंतर्गत चित्रपट उद्योगातील अनेक बड्या स्टार्सना सुरक्षा पुरवतो. त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर, कतरिना कैफ ते आमिर खान यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. (फोटो: रोनित बोस रॉय/इन्स्टा)
-
दरम्यान, १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात चोर घुसला होता. चोराला घरात पकडल्यानंतर त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. (फोटोः इंडियन एक्सप्रेस)
-
त्याच्यावर चाकूने सतत ६ वार केले. यानंतर चोर पळून गेला आणि सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्या पाठीतून २,५ इंचाचा चाकू काढला. (फोटोः इंडियन एक्सप्रेस)
सैफ अली खानने घेतली नवी सुरक्षा? बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता पुरवतो अनेक मोठ्या स्टार्सना सुरक्षा
Saif Ali Khan Hire New Security: सैफ अली खानने आपली सुरक्षा बदलली आहे. आता सैफच्या सुरक्षेची जबाबदारी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या हाती असणार आहे.
Web Title: This famous actor s agency will provide security to saif ali khan many stars take security spl