-
‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिता हे अर्जुनच्या सख्ख्या बहिणीचं पात्र अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत सुभेदारांचं घर अस्मिताशिवाय कायम अपूर्ण वाटतं. अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसारात ती कायम काही ना काही कुरघोड्या करत असते. मालिकेत मोनिका खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याला दाखवेललं नाही, ती माहेरी राहत असते असं कथानक आहे. पण, डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमापासून मोनिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा चर्चेत आला आहे.
-
अस्मिता म्हणजेच मोनिका लवकरच आई होणार आहे. यानिमित्ताने ‘ठरलं तर मग’च्या टीमने सेटवरचं मोनिकाचं डोहाळेजेवण केलं. यावेळी अभिनेत्रीचा नवरा देखील उपस्थित होता.
-
मोनिकाच्या पतीचं नाव चिन्मय कुलकर्णी असं आहे. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.
-
वैयक्तिक आयुष्यात चिन्मय आणि मोनिका लवकरच बाळाचं स्वागत करणार आहेत. या जोडप्याने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती.
-
मोनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या जोडप्याचे युट्यूब vlogs सुद्धा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे व चिन्मय कुलकर्णी इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ फेम अस्मिताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’ने केलाय सन्मान, करतो ‘हे’ काम
‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिता म्हणजेच मोनिका दबाडेचा नवरा आहे तरी कोण? तो काय काम करतो? जाणून घ्या…
Web Title: Tharla tar mag fame asmita aka monika dabade real life husband chinmay kulkarni see photos sva 00