-
अभिनेत्री, नृत्यांगना व मॉडेल म्हणून माधुरी पवार (Madhuri Pawar) ओळखली जाते. अभिनेत्रीने अप्सरा आली या रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
मालिकांमधील तिच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. ‘फुल मॅरेज, हाफ मॅरेज, नो मॅरेज’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘रान बाजार’, ‘देवमाणूस’ या मालिकांत माधुरी पवार महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
अभिनेत्री माधुरी पवारने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, साताऱ्याची काय काय वैशिष्ट्य आहेत?
-
त्यावर बोलताना माधुरीने म्हटले, “साताऱ्याला एक इतिहास आहे आणि महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.”
-
“त्यामुळे मी त्या भूमीत जन्म घेतलाय याचा सार्थ अभिमान, गर्व आहे.”
-
“साताऱ्याचे महाराज आता छत्रपती उदयनराजे तुम्हाला माहितीच आहेत. खरं तर आता जो ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग आहे ना, झुकेगा नहीं साला हा त्यांच्यासाठीच आहे.
-
“कारण- मी लहानपणापासून पाहिलंय ना, महाराज कोणापुढे कधीही झुकले नाहीत. अजूनही झुकत नाहीत.”
-
“तो राजा माणूस आहे. कधी आतापर्यंत समोरासमोर अशी भेट झाली नाहीये. पण, त्यांनी माझ्यासाठी चांगल्या गोष्टी बोलल्या, केलेल्या आहेत.”
-
“त्यांनी काही वेळा म्हटलं आहे की, साताऱ्याची पोरगी आहे, तू जिंकून यायचं. लढ तू बिनधास्त. हे जे आहे ना, ते साताऱ्यामधील माणसांमध्ये असतंच. सातारा म्हटलं की, फार जवळ वाटतं.”( सर्व फोटो सौजन्य : माधुरी पवार इन्स्टाग्राम)
“तुझ्यात जीव रंगला’फेम माधुरी पवारने केले उदयनराजे भोसले यांचे कौतुक; म्हणाली, “‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग…”
Madhuri Pawar: अभिनेत्री माधुरी पवार नेमकं काय म्हणाली?
Web Title: Tujhyat jeev rangala fame madhuri pawar praised udayanraje bhosale nsp