-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका जितकी चर्चेत असते, तितकेच त्यामधील कलाकारांचीदेखील चर्चा असते.
-
काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केला.
-
सर्वात आधी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अभिनेत्री मृणाली शिर्केने सोडली होती. तिने मालिकेत मिहीकाची भूमिका साकारली होती. पण आता नव्या भूमिकेतून मृणाली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाल शिर्केची वर्णी लागली आहे.
-
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे मालिकेत नवीन स्टार कास्ट झळकली आहे. या नव्या स्टार कास्टमध्ये मृणाली पाहायला मिळत आहे.
-
‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत मृणाली शिर्के जुही या भूमिकेत झळकली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत मृणालीसह काही मराठी चेहरे पाहायला मिळत आहेत.
-
अभिनेत्री मीरा सारांग, विनायक भावे यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारली आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केल्यानंतर आता अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत, पाहा फोटो
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कोणती अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार? जाणून घ्या…
Web Title: Mrunali shirke appear in hindi serial ghum hai kisikey pyaar meiin after exit in premachi goshta pps