-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा बुधवारी (१९ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात पार पडला.
-
शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2025) मराठी अभिनेत्री सायली पराडकरने (Sayali Paradkar) सुंदर फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटसाठी सायलीने निळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Blue Nauvari Saree) नेसली होती.
-
पैठणी नऊवारी साडीतील लूकवर सायलीने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery) केला होता.
-
या फोटोशूटला सायलीने ‘बाई ही शिवबाची तलवार.. बाई हा दुर्गेचा अवतार.. बाई ही मायेचा शृंगार.. बाई ही रणरागिणी हुशार ना.. महाराजांच्या विचारांप्रमाणे, स्वराज्य हवं तर लढा.. महाराजांची जयंती म्हणजे एक नवीन प्रेरणा आणि शक्ती मिळवण्याचा दिवस. त्यांचे धैर्य, त्यांचे नेतृत्व आणि त्यांचे स्वराज्य संकल्प सदैव अमर राहतील. नशीब लागतं शिवरायांच्या भूमीत जन्म मिळायला.. आपलं राजं.. तुमच्या समोर हा कणा कायम झुकत राहिल.. मुजरा स्वीकार करावा.. जय भवानी, जय शिवाजी..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अवधुत गुप्तेने (Avadhoot Gupte) सायलीच्या या फोटोशूटवर कमेंट केली आहे.
-
सायली कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ (Dholkichya Talavar) या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आली.
-
सायलीने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली पराडकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘बाई ही शिवबाची तलवार..’; शिवजयंतीनिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींचे सुंदर फोटोशूट
Shiv Jayanti 2025: या फोटोशूटसाठी सायलीने निळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली होती.
Web Title: Marathi actress sayali paradkar photoshoot chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 maharashtra sdn