-
अर्जुन मधुभाऊंच्या केससंदर्भात नवनवीन पुरावे शोधत असतो. याच दरम्यान अर्जुनच्या हाती एक मोठा पुरावा लागणार आहे. यामुळेच ‘ठरलं तर मग’ मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
-
“खूनाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिमविधीला गेले होते” असा जबाब साक्षी शिखरेने कोर्टात दिलेला असतो. साक्षी खोटं बोलतेय याची अर्जुनला खात्री असते त्यामुळेच काही करून अथर्व विचारेला शोधायचं असा निश्चय अर्जुन करतो.
-
अर्जुन सायलीला म्हणतो, “खूनाच्या रात्री साक्षी या अथर्व विचारेच्या अंत्यविधीला गेली होती असं म्हणाली होती. आपल्या केससाठी हा माणूस खूप महत्त्वाचा आहे.” यावर सायली देवाचा धावा करू लागते. काही करून आमच्या हाती मोठा पुरावा लागूदेत असं मागणं सायली देवाकडे मागते.
-
आता लवकरच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या विशेष भागात नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा भाग २७ फेब्रुवारीला रात्री ८.१५ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
-
अथर्व विचारे म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशी एन्ट्री घेणार आहे.
-
अनिरुद्ध जोशी यापूर्वी स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या मालिकेत खलनायकच्या भूमिकेत झळकला होता. तर, लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’मध्ये अनिरुद्धने नारद ऋषींची भूमिका साकारली होती.
-
आता अभिनेता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय असणाऱ्या आणि टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
-
दरम्यान, सायली अथर्व विचारेला पाहिल्यावर ही माहिती वेळीच अर्जुनपर्यंत कशी पोहोचवणार, त्याच्याशी नेमका काय संवाद साधणार या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी इन्स्टाग्राम प्रोमो )
‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवीन अभिनेता! कोणती भूमिका साकारणार? याआधी ‘सुख कळले’मध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका
‘ठरलं तर मग’मध्ये नवीन एन्ट्री! ‘सुख कळले’ फेम अभिनेता मालिकेत येणार, कोणती भूमिका साकारणार? पाहा फोटो
Web Title: Tharla tar mag star pravah serial new entry updates aniruddha joshi enters in show sva 00