-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळे कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत.
-
या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉण्डिंग आहे.
-
काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्या कलाकारांनी मिळून मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबाडेचं डोहाळेजेवण केलं होतं.
-
मोनिकाने आई होणार असल्याने काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेतून ब्रेक घेतला.
-
“मी मालिका सोडणार नाहीये. फक्त १-२ महिन्यांचा मोठा ब्रेक घेऊन मी पुन्हा येणार आहे.” असं मोनिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
-
यानंतर मालिकेत अस्मिता बाहेरगावी तिच्या नवऱ्याकडे जात असल्याचा सीक्वेन्स दाखवण्यात आला. यावरून इथून पुढे काही महिने अस्मिता हे पात्र प्रेक्षकांना ‘ठरलं तर मग’ मालिकेत दिसणार नाही हे स्पष्ट झालं.
-
मोनिका खऱ्या आयुष्यात आई होणार असल्याने सध्या ती प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी तिने स्वत:चा लूकही बदलला आहे.
-
“उन्हाळ्याची तयारी…चान्स पे डान्स करून हेअरकट करूनच घेतला” असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या फोटोंवर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्रींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आई केव्हा होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मोनिकाला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ मालिकेतून घेतला ब्रेक! अभिनेत्रीने आता लूकही बदलला; फोटो शेअर करत म्हणाली…
मालिकेतून ब्रेक घेतला अन् आता ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने बदलला लूक, पाहा फोटो
Web Title: Tharla tar mag fame this actress take break from serial for pregnancy change her look sva 00