-
मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.
-
सोनाली सध्या तिच्या जपान भ्रमंतीमुळे चर्चेत आली आहे.
-
अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांसह सध्या जपान देशात फिरायला गेली आहे. तिने आईबरोबरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनालीने या फोटोंना खूपच हटके कॅप्शन दिलं आहे.
-
सध्या सर्वत्र Ghibli ट्रेंड सुरू आहे. तोशियो सुझुकी यांनी स्थापन केलेला स्टुडिओ Ghibli हा एक प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे. सध्या सोनाली जपानमध्ये असल्याने तिने फोटोंना ‘Ghibli च्या देशातून’ असं अनोखं कॅप्शन दिलं आहे.
-
सोनाली आणि तिची आई या मायलेकींनी जपानमध्ये स्टायलिश लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
सोनालीच्या आईचं नाव सावी कुलकर्णी असं आहे. अभिनेत्री तिचे आई-बाबा आणि भावाबरोबर जपान फिरण्यासाठी गेली आहे.
-
‘हिरोशिमा पार्क’, ‘नबाना नो सातो विंटर इल्युमिनेशन’, ‘फ्लॉवर पार्क’, ‘फुजी पर्वत’, टोकियो अशा बऱ्याच ठिकाणांना सोनालीने भेट दिली आहे.
-
सोनालीच्या जपान भ्रमंतीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम )
मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ फिरतेय जपान देश! सोबतीला आहे आई, मायलेकींच्या स्टायलिश फोटोंचं होतंय कौतुक
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची जपान भ्रमंती! शेअर केले सुंदर फोटो…
Web Title: Sonalee kulkarni japan trip with mother shares beautiful photos sva 00