-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २८ एप्रिलपासून ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या नव्या मालिकेच्या माध्यमातून गिरीजा प्रभू व मंदार जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांचे लाडके गौरी-जयदीप आता कावेरी अन् यशच्या रुपात सर्वांचं मनोरंजन करतील.
-
या मालिकेत अनेक दमदार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
-
गिरीजा प्रभूच्या ( कावेरी ) बाबांची भूमिका या मालिकेत अभिनेते वैभव मांगले साकारणार आहेत. तर, कावेरीच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता माळवदकर झळकेल. तसेच मंदारच्या भावाचं उदय हे पात्र अभिनेता अमित खेडेकर साकारणार आहे.
-
मंदार या मालिकेत यश धर्माधिकारी ही भूमिका साकारणार आहे. त्याच्या धर्माधिकारी कुटुंबात कोण-कोण आहे जाणून घेऊयात…
-
या मालिकेत यशच्या आईची भूमिका अभिनेत्री सुकन्या मोने साकारणार आहेत.
-
तसेच अभिनेते सुदेश म्हाशीलकर, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार असे अनेक कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील.
-
याशिवाय, नंदिनी वैद्य आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री साक्षी गांधी सुद्धा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
-
दरम्यान, नवीन मालिका २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेची सध्याची ८:१५ ची वेळ बदलून पुन्हा एकदा ८:३० करण्यात येईल. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )
जुन्या जोडीची नवीन मालिका! ‘ठरलं तर मग’ची वेळ बदलणार, ‘स्टार प्रवाह’च्या नव्या सिरीयलमध्ये कोण-कोण झळकणार?
‘स्टार प्रवाह’वर येतेय नवीन मालिका! ‘कोण होतीस तू काय झालीस तू’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार…
Web Title: Star pravah kon hotis tu kay jhalis tu serial starcast tharla tar mag time slot change sva 00