-
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू-सुनेची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या दोघींच्या सुंदर बॉण्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. नुकत्याच, दिलेल्या मुलाखतीत मृणाल कुलकर्णींनी लाडक्या सुनेविषयी खास गोष्ट सांगितली आहे.
-
मृणाल कुलकर्णींचा मुलगा विराजस आणि शिवानी रांगोळे यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
सुनेविषयी सांगताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “मी सासूबाई झालेच नाहीये कारण, फक्त विराजसचं लग्न झालेलं आहे. शिवानी आम्हाला मुलीसारखीच आहे. तिला आम्ही आधीपासूनच ओळखत होतो.”
-
“मी तिच्यासाठी अजूनही ‘मृणाल ताई’ आहे आणि यामुळेच मला अजिबात तिची सासू वगैरे झाल्यासारखं वाटत नाही.” असं मृणाल कुलकर्णींनी सांगितलं.
-
नात्याने सासूबाई असल्या तरीही शिवानी मृणाल कुलकर्णींना प्रेमाने ‘ताई’ अशी हाक मारते.
-
“शिवानीला भरपूर यश मिळावं, तिला हवं ते काम मिळावं, हवे तेवढे दिवस काम करता यावं अशी आमची इच्छा आहे. आता ती आमची मुलगी आहे. तिच्या रुपात एक गुणी मुलगी आमच्या घरी आलीये” असं मृणाल कुलकर्णी या मुलाखतीत म्हणाल्या.
-
मृणाल कुलकर्णी, विराजस आणि शिवानी या तिघांनी ‘सुभेदार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
-
या सासू-सुनेच्या फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे )
शिवानी रांगोळे सासूबाईंना ‘या’ नावाने मारते हाक! मृणाल कुलकर्णी लाडक्या सुनेबद्दल म्हणाल्या…
शिवानी रांगोळे सासूबाई मृणाल कुलकर्णींना ‘या’ नावाने मारते हाक; दोघींमध्ये आहे सुंदर नातं, म्हणाल्या…
Web Title: Shivani rangole calls mother in law by this name reveals mrinal kulkarni sva 00