-
मराठी मालिकाविश्वातील दोन सख्ख्या भावांची जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.
-
हे दोन्ही भाऊ सध्या टेलिव्हिजन विश्वातील दोन आघाडींच्या वाहिन्यांवर महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
-
या दोघांमध्ये एकजण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. तर, दुसरा भाऊ ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे.
-
मराठी कलाविश्वातील या दोन सख्ख्या भावांची नाव आहेत मंदार जाधव व मेघन जाधव.
-
मंदार जाधव गेली अनेक वर्षे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. आता मंदार एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मंदारची प्रमुख भूमिका असलेली ‘कोण होतीस तू, काय झाली तू’ ही मालिका २८ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
तर, मेघन सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे.
-
जयंत या मालिकेत जान्हवीशी नेहमीच विकृतपणे वागताना दिसतो. जयंत या पात्रामुळे मेघन सध्या घराघरांत चर्चेत आला आहे.
-
मेघन आणि मंदार या दोघांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मंदार जाधव व मेघन जाधव इन्स्टाग्राम )
एक ‘स्टार प्रवाह’चा नायक, दुसरा ‘झी मराठी’वर खलनायक! ‘हे’ दोन अभिनेते आहेत सख्खे भाऊ, पाहा फोटो…
मराठी कलाविश्वातील ‘हे’ दोन अभिनेते आहेत सख्खे भाऊ, इंडस्ट्रीत होतेय दोघांची चर्चा, पाहा फोटो
Web Title: Mandar jadhav and meghan jadhav are real brothers both working in the famous serial sva 00