-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानबरोबरच्या सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
सध्या संपूर्ण देश अशी मागणी करत आहे की पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या भारतीयांचे जीवन वाया जाऊ नये. यावेळी पाकिस्तानला असा धडा शिकवा की भविष्यात असे भ्याड कृत्य करण्यापूर्वी ते हजार वेळा विचार करेल. (छायाचित्र: पीटीआय)
-
भारतीय फॅशन असो किंवा खाण्याच्या सवयी, जवळजवळ प्रत्येक गोष्ट पाकिस्तानी लोक फॉलो करतात. त्यांना भारतीय चित्रपटही आवडतात. (छायाचित्र: रॉयटर्स)
-
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या आठवड्यात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. पहिल्याचे नाव ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. (छायाचित्र: नेटफ्लिक्स)
-
५- टेस्ट
पाकिस्तानी लोकांना सर्वाधिक आवडणारा पाचवा भारतीय चित्रपट म्हणजे ‘टेस्ट’ जो या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या तमिळ स्पोर्ट्स थ्रिलर चित्रपटात आर. माधवन, नयनतारा, सिद्धार्थ आणि मीरा जास्मिन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
४- आझाद
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला चौथा भारतीय चित्रपट म्हणजे आझाद. अजय देवगणचा ‘आझाद’ हा चित्रपट या वर्षी १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
३- देवा
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला तिसरा भारतीय चित्रपट म्हणजे देवा. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ‘देवा’ हा चित्रपट पाकिस्तानच्या ओटीटीवर ट्रेंड करत आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
२- कोर्ट-स्टेट विरुद्ध अ नोबडी
पाकिस्तानमध्ये दुसरा सर्वाधिक पाहिलेला भारतीय चित्रपट म्हणजे कोर्ट-स्टेट विरुद्ध अ नोबडी. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली, त्याची लोकप्रियता पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानी लोकांनाही हा चित्रपट खूप आवडतोय. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
१- छावा
या आठवड्यात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेला चित्रपट म्हणजे छावा. हा ब्लॉकबस्टर चित्रपट मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शंभूजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो – नेटफ्लिक्स)
पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Most Watched Indian Movies in Pakistan: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १० चित्रपटांची नावे आहेत ज्यापैकी ५ भारतीय आहेत.
Web Title: Most watched indian movies in pakistan chhaava devaa azaad test hrc