-
मराठी अभिनेत्री मधुराणी गोखलेच्या (Madhurani Gokhale) साडीतील नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये मधुराणीने गडद लाल रंगाची साडी (Dark Red Saree) नेसली आहे.
-
गडद साडीतील लूकवर मधुराणीने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज (Green Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
‘तुझा आवडता रंग कुठला” असं मला जर कोणी विचारलं तर एक क्षण सुद्धा न दवडता मी बहाव्याचा सोनसळी रंग असं सांगते ! त्याच्या रंगांनी, त्याच्या दिसण्यानी त्याचा असण्यानी.. या तळपत्या उन्हात आपल्या डोळ्यांना किती सहज शांत करतो ना हा बहावा.. ही अंजोर ची बहावा ची साडी बघून मी या साडीच्या अगदी प्रेमात पडले.. आपल्या आवडीचं फूल ल्यायला कोणाला नाही आवडणार!! त्यात मी फुलं वेडी.. आणि हा फुलं वेडा असणारा ब्रांड.. आणि त्यातून बहरलेला हा आमचा बहावा…’ असे कॅप्शन मधुराणीने या फोटोंना दिले आहे.
-
मधुराणीच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘बहाव्या सारखी बहरणारी ती मधुराणी’ अशी कमेंट केली आहे.
-
मधुराणीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
या मालिकेत मधुराणीने ‘अरुंधती’ (Arundhati) ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Photos: ‘मी बहाव्याचा सोनसळी रंग…’; मधुराणी गोखलेच्या साडीतील लूकची चर्चा
मधुराणीच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘बहाव्या सारखी बहरणारी ती मधुराणी’ अशी कमेंट केली आहे.
Web Title: Marathi actress madhurani gokhale dark red hand painted saree look caption seeking attention sdn