-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
ही मालिका १८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
यामध्ये अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची फ्रेश जोडी झळकली. या दोघांनी अनुक्रमे एजे आणि लीला यांच्या भूमिका साकारल्या.
-
आता जवळपास १४ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
-
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग नुकतंच पार पडलं. या भागात लीलाचं डोहाळेजेवण साजरं करण्यात येईल आणि या मालिकेचा शेवट गोड होईल.
-
मालिकेच्या शेवटच्या दिवशी कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
कलाकार सेटवरच्या जहागीरदार बंगल्याची झलक दाखवत लिहितात, “जहागीरदारांचा बंगला… नेहमी माणसांनी हसत-खेळत वातावरण असायचं. माहिती नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील पण, जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील.”
-
“एक सुंदर प्रवास संपला…नवरी मिळे हिटलरला” अशी पोस्ट मालिकेत किशोरची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद लिमयेने शेअर केली आहे.
-
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये वल्लरी आणि राकेश बापट यांच्यासह माधुरी भारती, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, प्रसाद लिमये अशा अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी, नवरी मिळे हिटलरला मालिकेतील कलाकार )
‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार! १४ महिन्यांत घेणार निरोप, कलाकारांच्या भावुक पोस्ट…
Zee Marathi : ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट…
Web Title: Zee marathi navri mile hitlerla off air soon actors shares emotional post sva 00