-
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. सध्या हे दोघंही परदेशात फिरायला गेले आहेत.
-
एअरपोर्टवरील फोटो शेअर करत काही दिवसांपूर्वीच या दोघांनी परदेशात फिरायला जात असल्याची हिंट चाहत्यांना दिली होती.
-
ऐश्वर्या व अविनाश नारकर व्हिएतनाम फिरण्यासाठी गेले आहेत.
-
व्हिएतनाम ट्रिपचे फोटो, व्हिडीओ हे दोघंही सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
-
व्हिएतनाम फिरायला गेल्यावर या जोडप्याने एका खास जागी भेट दिली.
-
हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. याच हनोईमधील प्रसिद्ध ‘ट्रेन स्ट्रीट’ पाहण्यासाठी ऐश्वर्या व अविनाश नारकर गेले होते.
-
‘हनोई ट्रेन स्ट्रीट’ परिसरात या दोघांनी सुंदर फोटोशूट करत काही मजेशीर रील्स व्हिडीओ देखील बनवले आहेत.
-
अविनाश नारकरांनी ‘व्हिएतनाम डायरिज’ असं कॅप्शन देत आपल्या परदेशवारीची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
या ट्रिपदरम्यान दोघांनीही स्टायलिश लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सध्या ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या व्हिएतनाम ट्रिपचे फोटो सर्वत्र व्हायरल होत असून, नेटकरी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या व अविनाश नारकर इन्स्टाग्राम )
व्हेकेशन मोड ऑन! ऐश्वर्या व अविनाश नारकरांची परदेशवारी, ‘या’ देशात पोहोचले, शेअर केले खास फोटो…
हटके लूक, सुंदर जागा अन्…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा सफरनामा, पाहा फोटो…
Web Title: Aishwarya and avinash narkar went to vietnam visit hanoi train street shares photos sva 00