-
आता मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. मुमताज यांनी नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की राजेश खन्ना व त्या कधी रिलेशनशिपमध्ये होत्या का?
-
यावर उत्तर देताना मुमताज म्हणाल्या, “जर मी त्यांच्याबरोबर नात्यात असते तर बरं झालं असतं. पण, मी कधीच त्यांच्याबरोबर नात्यात नव्हते. मी हजार वेळा राजेश खन्नाबरोबर नात्यात नव्हते असे सांगितले आहे, पण तरीही मला लोक विचारत राहतात.”
-
“राजेश खन्ना माझी मैत्रीण अंजू महेंद्रूच्या प्रेमात होते. पण, त्याने १६ वर्षीय डिंपल कपाडियाबरोबर अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.”
-
“अंजूला त्याबाबत काहीच कल्पना नव्हती. पण, आजही ती त्यांच्या प्रेमात आहे. ती आजही त्यांच्याबद्दल बोलते. तिच्या घरात त्यांचे फोटो आहेत. ती त्यांचा खूप आदर करत असे आणि आजही ती त्यांचा आदर करते.”
-
पुढे मुमताज म्हणाल्या, “अंजू उत्तम प्रकारे पाहुणचार करते. जेव्हा माझे लग्न झाले होते, तेव्हा मी व माझे पती अंजूकडे जात असू. मला माहीत होते की ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. जेव्हा राजेश खन्ना यांनी तिला सोडून डिंपल कपाडियाशी लग्न केल्याचे समजले, तेव्हा मला आश्चर्य वाटले.”
-
“मला आजही असे वाटते की जर राजेश खन्ना अंजूबरोबर राहिले असते, तर तो आजही जिवंत असते.”
-
“अंजू त्यांची फुलासारखी काळजी घ्यायची. जेव्हा ते आजारी होता तेव्हा ती त्याच्या घरी राहून त्याची काळजी घ्यायची. त्याच्या खाण्या-पिण्याची, औषधांची ती काळजी घेत असे. अंजू खूप चांगली होती. पण, तुम्ही नशिबाला बदलू शकत नाही.”
-
मुमताज यांनी असादेखील खुलासा केला की, अंजू महेंद्रूबरोबर आजही त्यांची मैत्री आहे. जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केले, तेव्हा मुमताज यांनी अंजू महेंद्रूंना त्याचे कारण विचारले होते.
-
ठत्यावर अंजू महेंद्रू यांनी म्हटले होते की मला माहीत नाही, मी एका पार्टीमध्ये होते, तिथेच मला समजले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला तिच्या बॉयफ्रेंडने इतक्या वर्षांच्या नात्यानंतर सोडले म्हणून राग आला नाही. तिला स्वत:ला त्याच्यावर थोपवायचे नव्हते. तिला वाईट वाटले असणार, मात्र तिने तिचे दु:ख कधी दाखवले नाही. (सर्व फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
…तर राजेश खन्ना आज जिवंत असते; दिग्गज अभिनेत्री मुमताज म्हणाल्या, “ती आजही त्यांच्याबद्दल…”
Mumtaz on Rajesh Khanna: “तुम्ही नशिबाला…”, राजेश खन्ना यांच्याबाबत मुमताज म्हणाल्या…
Web Title: Veteran actor mumtaz says rajesh khanna would have been alive had he married anju mahendru nsp