-
शिवानी रांगोळेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. २५ मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
-
मालिका संपल्यावर आता प्रेक्षकांच्या लाडक्या मास्तरीणबाई परदेशात पोहोचल्या आहेत.
-
शिवानी रांगोळे व तिचा पती अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी हे दोघंही सध्या लॉस एंजेलिसची सफर करत आहेत.
-
शिवानीने याठिकाणी हॉलीवूड पार्कला भेट दिली. याशिवाय प्रसिद्ध वार्नर ब्रदर्स स्टुडिओ ( WB Studios ) देखील पाहिला.
-
शिवानीने वार्नर ब्रदर्स स्टुडिओमधील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याठिकाणी प्रसिद्ध FRIENDS मालिकेचं शूटिंग सुद्धा करण्यात आलं आहे.
-
विराजस व शिवानीने या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरुन खास फोटो शेअर केला आहे.
-
शिवानी पोस्ट शेअर करत लिहिते, “FRIENDS मालिकेचं ज्या ठिकाणी चित्रीकरण झालंय… त्या जागेला प्रत्यक्ष भेट देणं, ‘बॅटमॅन’सारख्या प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रॉप्सना स्पर्श करायला मिळणं, दिवसभर फक्त कलेविषयी चर्चा करणं…खूपच समाधानकारक अनुभव होता.”
-
प्रसिद्ध हॉलीवूड कलाकारांचे ऑटोग्राफ, फ्रेंड्स मालिकेचा सेट या सगळ्या गोष्टींची झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, शिवानी रांगोळेने शेअर केलेल्या लॉस एंजेलिसमधील या खास फोटोंवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे इनस्टाग्राम )
मास्तरीणबाई पोहोचल्या हॉलीवूडला! शिवानी रांगोळेने लॉस एंजेलिसमधून शेअर केले फोटो, FRIENDS मालिकेचा सेट पाहिलात का?
मालिका संपली अन् मास्तरीणबाई पोहोचल्या हॉलीवूडला! शिवानी रांगोळेने शेअर केले खास फोटो, ‘या’ ठिकाणी दिली भेट
Web Title: Shivani rangole went to hollywood visit friends series studio share photos from los angeles sva 00