-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखलं जातं.
-
सिद्धार्थने १४ जूनला पत्नी मिताली मयेकर आणि जवळच्या मित्रमंडळींसह आपला वाढदिवस साजरा केला.
-
सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याचे सगळे मित्रमंडळी एकत्र आले होते. यासाठी कामशेतजवळ सुंदर व्हिला बूक करण्यात आला होता.
-
सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्री व त्याची पत्नी मिताली मयेकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“आम्ही सगळ्यांनी सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वीकेंडला खूप धमाल केली. आमचा बर्थडे बॉय आनंदी होता… महत्त्वाचं म्हणजे दोन दिवस याठिकाणी अजिबात नेटवर्क नव्हतं पण, आम्हा सगळ्यांचं कनेक्शन आयुष्यभरासाठी जोडलं गेलं.” असं सुंदर कॅप्शन मितालीने ही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे.
-
सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
-
हरिश दुधाडे, श्रेया डफलापूरकर, गायत्री दातार, हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जुईली जोगळेकर, रोहित राऊत, नचिकेत लेले, क्षिती जोग या कलाकारांची झलक मितालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
मितालीने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोत सगळेजण क्रिकेट खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
याशिवाय मितालीने सिद्धार्थच्या बर्थडे केकची झलक सुद्धा चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यावर “तू अजूनही १८ वर्षांचा दिसतोस” असा मेसेज लिहिण्यात आला होता. ( सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर इन्स्टाग्राम )
सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन! आलिशान व्हिला, ‘या’ मराठी कलाकारांची उपस्थिती अन्…; पत्नीने शेअर केले सुंदर फोटो
सिद्धार्थ चांदेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, पत्नी मितालीने शेअर केले खास फोटो, ‘या’ मराठी कलाकारांची उपस्थिती
Web Title: Siddharth chandekar celebrates his birthday with friends wife mitali shares beautiful photos sva 00