• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. international yoga day 2025 bollywood actresses stay fit with yoga svk

International Yoda Day 2025 : ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींच्या योग सवयी तुम्हालाही ठेवू शकतात तंदुरुस्त

Happy Yoga Day 2025 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या योगाला त्यांच्या फिटनेस दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग मानतात. या स्टार्सनी त्यांची फिटनेस आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व समजून घेतले आहे आणि ते स्वीकारले आहे.

June 21, 2025 14:56 IST
Follow Us
  • Yoga Diaries How Bollywood Actresses Maintain Their Iconic Bodies Naturally
    1/11

    दरवर्षी २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्याला आठवण करून देतो की, योग हे केवळ व्यायामाचे नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीचे ते प्रतीक आहे. शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारा योग आज अनेक बॉलीवूड अभिनेत्रींच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनला आहे. या अभिनेत्री फक्त स्वतःला तंदुरुस्तच ठेवत नाहीत, तर लाखो लोकांना योगासाठी प्रेरितही करतात. चला पाहू, कोणत्या अभिनेत्री योगाच्या मदतीने आरोग्य आणि सौंदर्य जपत आहेत.

  • 2/11

    शिल्पा शेट्टी
    योग म्हटले की, शिल्पा शेट्टीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. वयाच्या १८ व्या वर्षापासून ती नियमितपणे योग करते. भुजंगासन, वक्रासन, नौकासन व अधोमुख श्वानासन ही तिची आवडती आसने आहेत. तिच्या मते, योगामुळे तिला फिट राहण्याशिवाय मानसिक शांतीही मिळते. (छायाचित्र स्रोत: @theshilpashetty/Instagram)

  • 3/11

    मलायका अरोरा
    फिटनेस आयकॉन मलायका अरोरा योगाला तिच्या जीवनशैलीचा मूलभूत भाग मानते. सूर्यनमस्कार, धनुषासन व पद्मासन यांना तिची खास पसंती असते. तिच्या मते, योगामुळे शरीर तंदुरुस्त तर राहतेच; पण त्वचाही नैसर्गिकरीत्या उजळते. (छायाचित्र स्रोत: @malaikaaroraofficial/Instagram)

  • 4/11

    करिना कपूर खान
    गरोदरपणानंतर वजन कमी करायचे असेल, तर करीनासारखा योगावर विश्वास ठेवा. ती रोज दीड तास योगाभ्यास करते. सूर्यनमस्कारासारखी आसने तिच्या रुटीनमध्ये असतात. करिनाच्या मते, योग तिच्या शरीराला ऊर्जा आणि मनाला (छायाचित्र स्रोत: @kareenakapoorkhan/Instagram)

  • 5/11

    आलिया भट्ट
    आलियाने गरोदरपणानंतर योगाला आपल्या दिनचर्येत सामावून घेतले. कपोतासन हे तिचे आवडते आसन, जे तिला शरीराने आणि मनाने अधिक मजबूत बनवते, असे तिचे म्हणणे आहे. (छायाचित्र स्रोत: @aliaabhatt/Instagram)

  • 6/11

    आलिया भट्ट
    आलियाने गरोदरपणानंतर योगाला आपल्या दिनचर्येत सामावून घेतले. कपोतासन हे तिचे आवडते आसन, जे तिला शरीराने आणि मनाने अधिक मजबूत बनवते, असे तिचे म्हणणे आहे. (छायाचित्र स्रोत: @deepikapadukone/Instagram)

  • 7/11

    कंगना रनौत
    कंगनाची योगाशी लहानपणापासूनच नाळ जुळलेली आहे. चक्रासन, नौकासन व शीर्षासन ही तिची आवड. तिच्या मते, योग म्हणजे मनःशांती आणि शारीरिक बळाचे उत्तम साधन आहे. (छायाचित्र स्रोत: @kanganaranaut/Instagram)

  • 8/11

    जॅकलिन फर्नांडिस
    जॅकलिन योगामध्ये पारंगत असून, कठीण आसनेही ती सहजतेने करते. पिलेट्स व अॅरोबिक्ससोबत योग करीत असल्यामुळे ती लवचिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित राहते. (छायाचित्र स्रोत: @jacquelienefernandez/Instagram)

  • 9/11

    सनी लिओनी
    सनी लिओनी योगप्रेमी असून, ती नियमितपणे तिचे योगा सेशन्स सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या मते, योग म्हणजे फक्त फिटनेस नव्हे, तो मानसिक शांती मिळविणयाचाही मार्ग आहे. (छायाचित्र स्रोत: @sunnyleone/Instagram)

  • 10/11

    बिपाशा बसू
    फिटनेससाठी ओळखली जाणारी बिपाशा बसू योगाला तिच्या व्यायामशैलीत महत्त्वाचे स्थान देते. तिच्या मते, योग शरीर तंदुरुस्त ठेवतो आणि आतली ऊर्जा जागवतो. (छायाचित्र स्रोत: @bipashabasu/Instagram)

  • 11/11

    ऐश्वर्या राय बच्चन
    ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्याइतकीच तिच्या फिटनेसबाबतही जागरूक आहे. संतुलित आहारासह योग तिच्या दिनचर्येचा भाग असून, ती योगामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवते. (चित्रपट जज्बा मधील चित्रे)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: International yoga day 2025 bollywood actresses stay fit with yoga svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.