-
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये त्याच्या आरोग्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले. (संग्रहित छायाचित्र)
-
सलमान खानने सांगितले की तो ब्रेन एन्युरिझम, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या आजारांनी ग्रस्त आहे. जाणून घेऊयात हा आजार नेमका काय आहे? (संग्रहित छायाचित्र)
-
काय आहे ब्रेन एन्युरिझम?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदूतील धमनीविकार (ब्रेन एन्युरिझम) हा एक गंभीर आणि सायलेंट आजार आहे. यामध्ये मेंदूतील शिरा कमकुवत होतात आणि त्या पाण्याचा बुडबुडा किंवा फुग्यासारख्या आकाराच्या बनतात. जेव्हा हा फुग्यासारखा भाग फुटतो तेव्हा मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते, जी प्राणघातकही ठरू शकते. (फोटो: Freepik) -
काय आहेत त्याची लक्षण?
दरम्यान या आजाराची लक्षणे बराच काळ स्पष्ट होत नाहीत, म्हणूनच याला सायलेंट किलर आजार म्हणतात. या स्थितीत, अचानक खूप तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना किंवा दाब, दुहेरी दृष्टी किंवा अंधुक दृष्टी, मान जड होणे, मळमळ किंवा उलट्या आणि किंवा झटके येणे अशी लक्षणे दिसून येतात. (संग्रहित छायाचित्र) -
जास्त धोका कोणाला आहे?
उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले, धूम्रपान करणारे आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. याशिवाय, जर कुटुंबात ब्रेन एन्युरिझमचा इतिहास असेल तेव्हा देखील हा आजार होऊ शकतो. ४०-६० वयोगटातील लोकांना याचा धोका जास्त असतो. (संग्रहित छायाचित्र) -
ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय?
याआधीही सलमान खानने सांगितले होते की त्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाचा आजार आहे, ज्यामुळे त्याला डोके, गाल आणि जबड्यात तीव्र वेदना होत असत. या वेदना इतक्या जास्त होत्या की कधीकधी तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस) -
ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो चेहऱ्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
एव्ही मालफॉर्मेशन म्हणजे काय ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील नसा असामान्य पद्धतीने जोडल्या जातात आणि रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. सलमान म्हणाला की या आजारांनंतरही तो सतत काम करत आहे. (संग्रहित छायाचित्र) -
(टीप- ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही उपचारांआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या) (फोटो – इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री देतात योगासनांना महत्व; ५०-५१ व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस…
सलमान खानला आहे ‘ब्रेन एन्युरिझम’ हा आजार; या ‘सायलेंट किलर’ आजाराची लक्षणे काय असतात? जाणून घ्या…
Salman khan brain aneurysm: सलमान खानने सांगितले की तो ब्रेन एन्युरिझम, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या आजारांनी ग्रस्त आहे. जाणून घेऊयात हा आजार नेमका काय आहे?
Web Title: Salman khan reveals he suffers from brain aneurysm av malformation avm and trigeminam neuralgia kapil sharma show spl