-
गँग्ज ऑफ वासेपूर हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक कल्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचं दिगदर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. (सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस आणि जनसत्ता)
-
गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटात मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत होता. तर दुसऱ्या पार्टमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी नायक होता.
-
गँग्ज ऑफ वासेपूर हा सिनेमा दोन भागांमध्ये आला होता. यातील सरदार खान (मनोज वाजपेयी) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (फैजल खान) प्रमुख भूमिकेत होते.
-
पंकज त्रिपाठी यांचीही या सिनेमात प्रमुख भूमिका होती. सुलतान या त्यांच्या पात्राने सगळ्यांनाच घाबरवलं होतं.
-
तसंच तिग्मांशू धुलियाने साकारलेला रामाधीर सिंगही सगळ्यांनाच आवडला
-
मनोज वाजपेयी आणि रायमा सेन यांच्यात शूट झालेला हा सीन खरंतर चित्रपटातला सर्वात गाजलेला सीन आहे.
-
हा सीन म्हणजे फक्त स्क्रीन टेस्टसाठी शूट करण्यात येत होता. तितक्यात अनुराग कश्यपने मनोज वाजपेयींना या सीनमध्ये बोलवलं. त्यानंतर या दोघांनी जे काही केलं तो सीन तसाच सिनेमात ठेवण्यात आला. अनुराग कश्यप यांनी हा किस्सा सांगितला होता.
-
गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशी मातीतला गॉडफादर असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल इतका हा सिनेमा क्लासिक आहे.
-
सुलतानच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीने जी कमाल केली आहे ती पाहून आपल्याला त्याची भीती वाटते यात शंकाच नाही.
-
गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमताला हा प्रसंगही जबरदस्त शूट करण्यात आला आहे. रामाधीरला सुनावण्यासाठी सरदार खान जातो तो हा सीन आहे.
-
नवाजुद्दीन सिद्दिकी आणि हुमा कुरेशी यांचीही उत्तम केमिस्ट्री या चित्रपटात दिसून आली.
-
खासरकरुन या दोघांचा परमिशनचा सीन विशेष गाजला आहे.
-
नवाजुद्दीन सिद्दिकीने या सिनेमात जबरदस्त काम केलं आहे. मनोज वाजपेयी इतकाच ताकदीचा रोल नवाजने केला आहे.
-
या चित्रपटातला रामाधीर सिंग म्हणजेच तिग्मांशू धुलियाचा रोलही लक्षात राहण्यासारखाच झाला आहे. हा चित्रपट कधीही विस्मरणात जाणार नाही.
Gangs Of Wasseypur : ‘गँग्ज वासेपूर’चा आयकॉनिक सीन चित्रपटात कसा आला? रंजक किस्से काय?
गँग्ज ऑफ वासेपूर हा अनुराग कश्यप दिग्दर्शित एक अजरामर सिनेमा आहे. या सिनेमाला १३ वर्षे झाली आहेत. हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता.
Web Title: Gangs of wasseypur completed 13 years know about the unknown facts and shooting stories behind the camera scj