-

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवीन मालिका ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ सध्या जोरदार चर्चेत आहे.
-
या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या मालिकेत ‘फुलाला सुगंध मातीचा’फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी कोरी जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
-
समृद्धी आणि अभिषेक यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी जुळते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनयासोबतच ऑफ-स्क्रीन धमाल मस्तीचे क्षणही या फोटोंमधून समोर येत आहेत.
-
झपाटलेला’ फेम अभिनेत्री पूजा पवारदेखील या मालिकेत अभिषेक रहाळकरच्या आईच्या म्हणजेच ‘बाळजाबाई’च्या लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत.
-
७ जुलैपासून सोमवार ते शनिवारदरम्यान दुपारी १ वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत समृद्धी केळकरबरोबर दिसणार ‘हा’ अभिनेता; मुहूर्ताचे फोटो पाहिलेत का?
स्टार प्रवाहवर ७ जुलैपासून ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर ही नवी जोडी प्रमुख भूमिकेत असून, एका गावरान मुली आणि शहरी तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित ही मालिका आहे.
Web Title: Star pravah serial halad rusli kunku hasla samruddhi kelkar abhishek rahalkar star pravah svk 05