-
‘झी मराठी’ वाहिनीवर ‘कमळी’ मालिका येत्या ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
“पुस्तकात मन हीचं रमून जाई अन् आयुष्याचे धडे गिरवीत राही…अशी ही आमची ‘कमळी” असं कॅप्शन देत या नव्या मालिकेचा प्रोमो ‘झी मराठी’ने प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे.
-
‘कमळी’ ही खेडेगावात राहणारी मुलगी असते. पण, तिच्या भूतकाळात काहीतरी वेगळंच घडलेलं असतं.
-
‘कमळी’चा जन्म राजघराण्यात झालेला असतो पण, त्यानंतर ती कशी हरवते? मालिकेचा नेमका ट्विस्ट काय असेल हे आपल्याला ३० जूनपासून पाहायला मिळेल.
-
मालिकेत ‘कमळी’ची मुख्य भूमिका अभिनेत्री विजया बाबर साकारात आहे.
-
यापूर्वी तिने ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका ‘सोनी मराठी’वर प्रसारित केली जायची. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
याशिवाय विजयाने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
आता विजया ‘कमळी’च्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
तिच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेता निखिल दामले मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तो ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता. ( सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर व झी मराठी इन्स्टाग्राम )
Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
‘झी मराठी’वर येतेय नवीन मालिका ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री, जाणून घ्या ‘या’ नायिकेबद्दल…
Web Title: Zee marathi new serial kamali this actress vijaya babar in lead role know about her sva 00