• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmi niwas tv serial siddhu bhavana wedding ceremony varat bridal look nauvari saree photos sdn

Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा

पावसाळ्यात हे शुटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला. शुटिंग सुरू व्हायचे, तसेच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा चित्रीकरण थांबवावे लागले.

Updated: June 25, 2025 11:01 IST
Follow Us
  • Lakshmi Niwas TV Serial Siddhu Bhavana Wedding
    1/15

    झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

  • 2/15

    या मालिकेतील कथानक सध्या अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचले आहे.

  • 3/15

    भावना आणि सिद्धूच्या लग्नामुळे गावात व गाडे पाटलांच्या घरात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच या लग्नाचा भव्य सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • 4/15

    सुरुवातीला विरोध झाला असला तरी पक्षाच्या दबावामुळे गाडे पाटलांना अखेर लग्नासाठी संमती द्यावी लागली.

  • 5/15

    सिद्धू म्हणजे गाडेपाटलांचा लाडका राजकुमार आणि त्याचं लग्नही तेव्हढ्याच थाटात होणार, यात काही शंका नाही.

  • 6/15

    या मालिकेत सिद्धूची घोड्यावर दमदार एन्ट्री, ब्रास बँडचा गाजावाजा आणि साऱ्या गावाचा उत्साह दाखवण्यात आला आहे.

  • 7/15

    या सुंदर दृश्यामागे संपूर्ण युनिटची अफाट मेहनत लपलेली आहे.

  • 8/15

    पावसाळ्यात हे शुटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला.

  • 9/15

    शुटिंग सुरू व्हायचे, तसेच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा चित्रीकरण थांबवावे लागले.

  • 10/15

    परंतु सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मिळून जिद्दीने तब्बल १० तास या वरातीचे शूट केले.

  • 11/15

    प्रेक्षकांसमोर दृश्य जसे रंगतदार दिसते, तसे ते पडद्यामागे घडवण्यासाठी खूप संयम, तयारी आणि समन्वय लागतो.

  • 12/15

    लग्नाच्या जवळपास प्रत्येक सीनमध्ये एकाच वेळी २५-३० कलाकार, ब्रास बँड, घोडा, सजावट आणि इतर टेक्निकल गोष्टी हाताळणं हे युनिटसाठी मोठे आव्हान ठरले.

  • 13/15

    पण शेवटी म्हणतात ना ज्या जन्मगाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्या कोणत्याही अडथळ्यामुळे तुटत नाहीत! भावना-सिद्धूचं हे लग्न त्याचे प्रतीक ठरले.

  • 14/15

    हे लग्न म्हणजे नात्यांमधील गुंतागुंत, राजकीय दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संगम असून, ही मालिका पुढे काय वळण घेते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • 15/15

    सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम (हेही पाहा : ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज पोहोचला वारीत; ‘हे’ रूप पाहून भारावलेले वारकरी झाले नतमस्तक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Lakshmi niwas tv serial siddhu bhavana wedding ceremony varat bridal look nauvari saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.