-
छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती मराठी अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर.
-
‘मुलगी झाली हो’ आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतून दिव्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
सध्या ती झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या मालिकेत ती जान्हवी ही भूमिका साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते, सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो शेअर करते.
-
अशातच तिने हिरव्या साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत आणि यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
केसांत गुलाब, नाकात नाथ अन् गळ्यात मोठं मंगळसूत्र असा खास लूक तिने केला आहे.
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोमधील तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
गोड गोजिरी… ‘लक्ष्मी निवास’मधल्या जान्हवीचं मनमोहक हास्य, पाहा सुंदर फोटो
दिव्या पुगावकरने शेअर केले साडीमधील सुंदर फोटो, मनमोहक हास्य पाहून चाहते म्हणाले…
Web Title: Laxmi niwas zee marathi serial fame actress divya pugaonkar share saree photos on social media ssm 00