-
Shefali Jariwala Death: आज मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बिग बॉस १३ फेम आणि कांटा लगा गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे.
-
हृदयविकाराचा झटका आल्याने तिने वयाच्या ४२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
-
तिने ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले. ‘नच बलिए’ आणि ‘बिग बॉस 13’ सारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला. शेफालीने वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
-
दरम्यान तिच्या लोकप्रिय अशा कांटा लगा या गाण्यासाठी तिला किती रुपये मानधन मिळालं होतं हे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
शेफालीचं हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं, या गाण्याला आजही लोक पसंत करतात. तिच्या या गाण्याला सध्या युट्यूबवर ९७ मिलियन व्ह्यूज आहेत.
-
शेफालीने मुलाखतीत सांगितले होतं की ती मित्रांबरोबर कॉलेजच्या बाहेर उभी होती, तिथेच गाण्याचे मेकर्स तिला भेटले आणि गाण्यासाठी तिला विचारलं आणि तिची निवड केली.
-
दरम्यान या गाण्यासाठी शेफालीची आई तयार होती पण वडिलांचा काहीसा विरोध होता, पण जेव्हा गाण्याचे दिग्दर्शक तिच्या वडिलांशी बोलले तेव्हा तेही तयार झाले.
-
शेफालीला या गाण्यासाठी ७ हजार रुपये मानधन मिळाल्याचं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
(सर्व फोटो सौजन्य- शेफाली जरीवाला इन्स्टाग्राम)
‘कांटा लगा’ गाण्यासाठी शेफाली जरीवालाला किती पैसे मिळाले होते? गाण्यासाठी कशी झाली होती तिची निवड?
Shefali jariwala kaanta laga fees, shefali jariwala death : हृदयविकाराचा झटका आल्याने तिने वयाच्या ४२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
Web Title: Shefali jariwala kaanta laga fees how she got kaanta laga song spl