-
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) लवकरच झी मराठीच्या (Zee Marathi) ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Vin Doghantali Hi Tutena) या नव्या मालिकेत (New TV Serial) दिसणार आहे.
-
या मालिकेत तेजश्री ‘स्वानंदी सरपोतदार’ (Swanandi Sarpotdar Role) ही भूमिका साकारणार आहे.
-
नव्या मालिकेच्यानिमित्त तेजश्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली (Instagram Post) आहे.
-
‘ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली.. सज्ज झाल्ये पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची “जागा” निर्माण करायला, एक नविन पात्र, नव्या उमेदीने जगायला.. लवकरचं भेटूया ‘स्वानंदी सरपोतदार’ला.. आशीर्वाद असू द्या..’
-
या फोटोंमध्ये तेजश्रीने लाल रंगाचा प्लेन ड्रेस (Red Plain Dress Look) परिधान केला आहे.
-
तेजश्रीबरोबर या मालिकेत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अद्याप झी मराठी वाहिनीने जाहीर केलेली नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
Photos: तेजश्री प्रधान नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ भूमिका, स्वत: सांगितलं पात्राचं नाव; म्हणाली, “लवकरच भेटूया…”
Vin Doghantali Hi Tutena TV Serial: तेजश्रीबरोबर या मालिकेत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे.
Web Title: Actress tejashri pradhan zee marathi new tv serial vin doghantali hi tutena reveals role photos sdn