-
राजश्री मोरे हे नाव सध्या चर्चेत आले आहे. ती एक मराठी इन्फ्लुएन्सर आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण आणि ती कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात…
-
का आली चर्चेत?
५ जुलै रोजी तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मराठी माणसांना आधी मेहनत करायला शिकवा असं ती त्यात म्हणत होती. ज्यावरुन तिला ट्रोल केलं गेलं, तिच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात मनसेने तक्रार केली. ज्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलिट केला. तसंच नवा व्हिडीओ पोस्ट करत आपले शब्द मागे घेतले. -
मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट
६ जुलै रोजी रात्री राजश्री मोरेच्या कारचा अपघात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता. त्याची गाडी राजश्रीच्या गाडीवर आदळली. -
या घटनेदरम्यानचा व्हिडिओ राजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत तिच्यावर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत होता. तसेच तो घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसत होता. या प्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली तसेच मला टार्गेट केलं जात असल्याचाही दावा तिने केला होता. याप्रकरणी तिला नेटकऱ्यांचा मोठा पाठींबा मिळाल्याचेही पाहायला मिळाले.
-
राज ठाकरेंना विनंती
त्यानंतर तिने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राद ठाकरेंनाच विनंती केली आहे, ती म्हणाली, “मी तुम्हाला विनंती करते की मराठी मुलीला त्रास होतो आहे तो तुम्ही आधी थांबवा. माझ्या जिवाला काहीही झालं तर तुमच्याच पक्षावर सगळं येणार, मला, माझ्या कुटुंबावर हल्ला झाला तर जबाबदारी मनसेची असेल. मी राजश्री मोरे ही मराठी मुलगी तुम्हाला हे सांगते आहे. माझ्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका. मी तुम्हाला विनंती करते आहे.” असं राजश्री मोरेने म्हटलं आहे.” -
कोण आहे राजश्री मोरे?
दरम्यान, राजश्रीच्या सोशल मीडियावरून ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे स्पष्ट होते. -
नेल आर्ट स्टुडिओ
मुंबईतील लोखंडवाला मार्केटमध्ये चालवते एक नेल आर्ट स्टुडिओ, जिथे मोठ्या सेलिब्रिंटींची रेलचेल पाहायला मिळते. -
राखी सावंतविरोधात तक्रार
काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतविरोधात तक्रारही दाखल केलेलं तिच्या सोशल मीडियावर सांगितलेलं आहे. -
राखी सावंतची मैत्रीण
माध्यमांतील माहितीनुसार राखी सावंत आणि राजश्री मोरे या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यातील वैयक्तिक वादानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. (सर्व फोटो सौजन्य- राजश्री मोरे इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : पोर्तुगालमधील मडेरा बेटावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट; म्हणाली, “हे तीन दिवस…”
कोण आहे राजश्री मोरे? मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न व्हिडिओ शेअर केल्यानं आली आहे चर्चेत…
Who Is Rajshree more : राजश्री मोरे सध्या खूप चर्चेत आली आहे, ती कोण आहे? तिचं चर्चेत येण्यामागचं कारण काय? तसेच ती काय करते? हे आपण आज जाणून घेऊयात…
Web Title: Who is rajshree more marathi influencer why she come into the spotlight maharashtra navnirman sena raj thackeray spl