• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kapil sharma malaika arora to shilpa shetty celebs who own restaurants and cafes spl

कपिल शर्मा, मलायका अरोरा ते शिल्पा शेट्टी; रेस्टॉरंट्स आणि कॅफेचे मालक आहेत ‘हे’ सेलिब्रिटी…

कपिल शर्माच्या कॅनडामधील सरे इथे नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता. आज आपण भारतातील इतर सेलिब्रिटींच्या हॉटेल-कॅफेंबद्दल जाणून घेऊयात..

Updated: July 14, 2025 17:54 IST
Follow Us
  • Kapil Sharma, Malaika Arora, Shilpa Shetty: Celebs who own restaurants and cafes
    1/9

    Kapil Sharma
    कपिल शर्माच्या कॅनडामधील सरे इथे नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता. आज आपण भारतातील इतर सेलिब्रिटींच्या हॉटेल-कॅफेंबद्दल जाणून घेऊयात..

  • 2/9

    Shilpa shetty
    शिल्पा शेट्टीचे मुंबईत ‘बास्टियन’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ते दादरमधील कोहिनूर इमारतीच्या वरच्या बाजूला आहे. बास्टियन हे एक लोकप्रिय सेलिब्रिटी रेस्टॉरंट आहे, याच नावाने शिल्पाचे आणखी एक रेस्टॉरंट बंगळूरुमध्ये आहे.

  • 3/9

    Badshah
    बादशाह एक प्रसिद्ध भारतीय रॅपर, गायक, गीतकार, संगीत निर्माता, आणि टीव्ही व्यक्तिमत्व आहे. तो एक यशस्वी उद्योजक देखील आहे. त्याने विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात हॉस्पिटॅलिटी, फॅशन, आणि फूड इंडस्ट्री यांचा समावेश आहे. त्याने अलीकडेच मुंबईत बॅड बॉय पिझ्झा लाँच केला.

  • 4/9

    Boby Deol
    बॉबी देओलचे ‘समप्लेस एल्स’ (Someplace Else) नावाचे रेस्टॉरंट आणि लाउंज आहे, जे मुंबईतील अंधेरी येथे आहे. या ठिकाणी भारतीय आणि चायनीज खाद्यपदार्थ मिळतात.

  • 5/9

    Malaika Arora
    मलायका अरोराचे मुंबईत स्कारलेट हाऊस नावाचे रेस्टॉरंट आहे, जे तिने तिच्या मुलासोबत सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट वांद्रे (Bandra) येथील पाली व्हिलेज (Pali Village) मध्ये आहे. तिने मुलगा, अरहान खानबरोबर मिळून हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट एका ९० वर्षे जुन्या बंगल्यात आहे.

  • 6/9

    Gauri Khan
    शाहरुखची पत्नी गौरी खानने मुंबईत ‘टोरी’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे, इथे पॅन-आशियाई खाद्यपदार्थ (pan-Asian cuisine) मिळतात. हे रेस्टॉरंट वांद्रे (Bandra) येथे आहे आणि गौरी खानने स्वतःच डिझाइन केले आहे. टोरी हे एक सेलिब्रिटी हॉटस्पॉट (celebrity hotspot) म्हणूनही ओळखले जाते. 

  • 7/9

    Kangana Ranaut
    कंगना रणौतने हिमाचल प्रदेशात ‘द माउंटन स्टोरी’ हे रेस्टॉरंट उघडले आहे. हे तिचे खास स्वप्न होते.

  • 8/9

    Karan Johar
    करण जोहरचे मुंबईत ‘न्यूमा’ नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट कुलाबा येथे आहे आणि तिथे युरोपीययन-शैलीतील जेवण मिळते. न्यूमा हे करण जोहरने True Palette Cafe Private Limited आणि धर्मा कॉर्नरस्टोनचे CEO बंटी सजदेह यांच्यासोबत मिळून सुरू केले आहे.

  • 9/9

    Virat Kohli
    विराट कोहलीचे ‘वन8 कम्यून’ नावाचे रेस्टॉरंट्स आहेत जे मुंबई, दिल्लीसह विविध शहरांमध्ये आहे. हेही पाहा- Wimbledon 2025: साराने पहिल्यांदा पाहिली विम्बल्डन स्पर्धा; आई वडिलांबरोबरचा सेल्फी ते हटके कॅप्शन चर्चेत…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kapil sharma malaika arora to shilpa shetty celebs who own restaurants and cafes spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.