-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात लोकप्रिय झाला.
-
नुकतीच पृथ्वीकने मुंबईच्या राणीबागेत (Rani Baug, Mumbai) भटकंती केली आहे.
-
राणीबागेतील काही फोटो शेअर करत पृथ्वीक म्हणाला… “जाईच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी मला राणीबाग म्हणजेच ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला” भेट देता आली.
-
“आम्ही संपूर्ण कुटूंब या सफारीसाठी गेलो होतो. खरं तर… मी खूप लहान असताना राणीच्या बागेत आलो होतो पण, आज इतक्या वर्षांनी परत आल्यानंतर हे ठिकाण मला खूप बदललेलं जाणवतंय…”
-
“मुंबईच्या धावपळीच्या जीवनात, गोंगाटात शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर राणीबाग हे खरचं उत्तम ठिकाण आहे.”
-
“हे ठिकाण फक्त लहान मुलांसाठीचं नाही आहे. तर तुम्हाला निसर्ग, प्राणी, झाडं यांच्याविषयीची योग्य माहिती हवी असल्यास ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल..”
-
“इथे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी, पक्षी, तसेच पेंग्विन्स सुद्धा पाहायला मिळतात.”
-
“या सफारीच्या वेळी मी सुद्धा थोडा लहान झालो छान बागडलो, जाई आणि आम्ही सर्वानी मजा केली. तो दिवस एन्जॉय केला.. एक दिवस छान मोकळा वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत ह्या ठिकाणी नक्की भेट द्या मजा येईल…
-
(सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप/इन्स्टाग्राम)
Photos: पृथ्वीक प्रतापची मुंबईच्या राणीबागेत भटकंती; वाघाबरोबरचा सेल्फी शेअर करत म्हणाला…
The Mumbai Zoo Veermata Jijabai Bhosale Udyan: “आम्ही संपूर्ण कुटूंब या सफारीसाठी गेलो होतो. खरं तर… मी खूप लहान असताना राणीच्या बागेत आलो होतो पण, आज इतक्या वर्षांनी परत आल्यानंतर हे ठिकाण मला खूप बदललेलं जाणवतंय…”
Web Title: Actor prithvik pratap visited the mumbai zoo rani baug veermata jijabai bhosale udyan photos viral sdn