• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why marathi singer suresh wadkar rejected madhuri dixit raza murad reveals nobody cared about her parents told her to quit films nsp

लोकप्रिय मराठी गायकाने माधुरी दीक्षितला लग्नासाठी का दिलेला नकार?

Singer rejected to Madhuri Dixit: “त्यांनी तिला मुंबईमध्ये…”, माधुरी दीक्षितबाबत अभिनेते काय म्हणाले?

July 28, 2025 20:29 IST
Follow Us
  • Madhuri Dixit
    1/9

    ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. पण, अभिनय क्षेत्रातील तिचा सुरुवातीचा काळ खडतर होता. सुरुवातीच्या चित्रपटांतून तिला लोकप्रियता मिळाली नव्हती.

  • 2/9

    इतकेच नाही, तर माधुरी दीक्षितचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप ठरले. त्यामुळे तिने लग्न करावे, असे तिच्या आई-वडिलांना वाटत होते.

  • 3/9

    आता रझा मुराद यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितबाबत वक्तव्य केले. त्याबरोबरच एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात नशीब ही खूप मोठी गोष्ट असते, असेही ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत रझा मुराद म्हणाले की, ‘जंजीर’ चित्रपट गाजण्याआधी अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले होते.”

  • 4/9

    त्यानंतर ते माधुरी दीक्षितबद्दल म्हणाले, “तिने ‘आवारा बाप’, ‘अबोध’सारख्या महत्त्वाच्या चित्रपटांत काम केले. कोणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. तिच्या पालकांनी तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण- माधुरीचे करिअर अगदीच सुमार चालू होते. तिच्या पालकांनी एका पार्श्वगायकाशी संपर्क साधला. त्यांची भेट घालून दिली. जेव्हा तो भेटला, तेव्हा तो गायक माधुरीकडे पाहून म्हणाला की, ती खूप बारीक आहे.”

  • 5/9

    पुढे रझा मुराद म्हणाले, “काही काळानंतर माधुरी काश्मीरमध्ये राजेश खन्ना यांच्याबरोबर शूटिंग करत होती. त्यादरम्यानच सुभाष घईदेखील तिथे गेले होते. त्यावेळी त्यांची भेट माधुरीबरोबर झाली. त्यांनी तिला मुंबईमध्ये भेटण्यास सांगितले. त्यांनी तिला राम लखन या चित्रपटातून पुन्हा लाँच केले.

  • 6/9

    २०२३ मध्ये ‘सा रे गा मा पा’ या रिअॅलिटी शोमध्ये लोकप्रिय गायक सुरेश वाडकर पत्नीसह यांनी हजेरी लावली होती. ‘सा रे गा मा पा’चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने सुरेश वाडकर यांना विचारले की तुमच्याबद्दल अशा चर्चा आहेत की एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या पालकांनी त्यांच्या मुलीसाठी तुम्हाला लग्नाची मागणी घातली होती, हे खरे आहे का?

  • 7/9

    आदित्यचा प्रश्न ऐकल्यानंतर सुरेश वाडकर त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पाहिले. ते पुढे म्हणाले की, ते आयुष्यात खूप समाधानी आहेत. त्यांच्या आयुष्यात ‘पद्मा नावाची माधुरी’ असल्याने ते खूप आनंदित आहेत.

  • 8/9

    त्यांच्या या उत्तराने अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह इतर परीक्षकांना धक्का बसला होता. सुरेश वाडकर त्यावेळी असेही म्हणालेले की, टेलिव्हिजनच्या राष्ट्रीय वाहिनीवर त्यांनी जे सांगितले, त्याबद्दल एक दिवस त्यांना फटकारले जाण्याची शक्यता आहे.

  • 9/9

    १९९९ मध्ये माधुरीने अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यानंतर कुटुंबासाठी काही काळ अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. २००० च्या दशकाच्या मध्यात ती डॉ. नेने आणि त्यांच्या दोन मुलांसह भारतात परतली. सध्या अभिनेत्री मराठी हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. (सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Why marathi singer suresh wadkar rejected madhuri dixit raza murad reveals nobody cared about her parents told her to quit films nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.