-
Maharashtra State Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा काल (०५ ऑगस्ट) वरळी येथील एनएससीआय डोममध्ये पार पडला.
-
याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
-
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकार व मान्यवर उपस्थित होते.
-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru) ‘आशा’ (ASHA Movie) या चित्रपटासाठी ‘राज्य पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री, कै. स्मिता पाटील पारितोषिक’ (Best Actress Award) हा पुरस्कार मिळाला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी रिंकूने सोनेरी रंगाची सुंदर साडी (Golden Saree Look) नेसली होती.
-
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव (Congratulations, Best Wishes From Fans) केला आहे.
-
‘जगाच्या सृजनशीलतेवर व सांस्कृतिकतेवर मोहिनी टाकण्याची ताकद मराठी चित्रपटांमध्ये आहे’ असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Photos: रिंकू राजगुरूला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’
मराठी चित्रपटसृष्टीचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणाऱ्या ६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण…
Web Title: Actress rinku rajguru got maharashtra state marathi film awards 2025 diamond jubilee photos sdn