-
सध्या महाराष्ट्रासह सबंध देशामध्ये महादेवी हत्ती प्रकरण खूप चर्चेत आहे. कोल्हापूरकरांनी तिच्यासाठी आंदोलनं केली, स्वाक्षरी मोहीम राबवली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य : वनतारा आणि कोल्हापूर पेज/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, जगभरातील अनेक चित्रपटांमध्ये इतर प्राण्यांसह हत्ती आणि माणसातील घट्ट नातंही दाखवण्यात आलं आहे. काळ बदलत गेला तसा अनेक ओटीटी सिरीजमध्ये देखील माणसाचे आणि प्राण्यांमधले बाँड पाहायला मिळाले. (छायाचित्र लोकसत्ता टीम)
-
भारतीय चित्रपट जगतातही असे अनेक प्रयोग केले गेले आणि ते प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले. आज आपण अशाच काही चित्रपट व वेब सिरीजची माहिती आज घेऊ. (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
-
चित्रपट
ऑपरेशन डंबो ड्रॉप (Operation Dumbo Drop)
हा चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. सायमन विन्सर दिग्दर्शित हा अमेरिकन वॉर कॉमेडी चित्रपट आहे. युनायटेड स्टेट्स आर्मी मेजर जिम मॉरिस यांच्या वास्तविक घटनेवर आधारित आहे. (Photo: You tube) -
डंबो (Dumbo)
हा एक ॲनिमेटेड चित्रपट आहे, यामध्ये मोठ्या कानांचा हत्ती खूप प्रसिद्ध असतो आणि तो उंदराच्या मदतीने उडण्याची कला शिकतो. (Photo: IMDb) -
कुमकी (Kumki):
हा एक तमिळ चित्रपट आहे, यामध्ये हत्ती आणि माणसांमधील प्रेमाचे व सहानुभूतीचे उत्तम चित्रण पाहायला मिळते. (Photo: Youtube) -
द मॅजिशियन्स एलिफंट (The Magician’s Elephant):
हाही एक ॲनिमेटेड चित्रपट आहे, यामध्ये एका मुलगा हत्ती शोधत असतो. ही मजेदार गोष्ट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. (Photo: Netflix) -
माहितीपट
द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers):
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ अशी शॉर्ट फिल्म (माहितीपट) आहे. २०२३ सालच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या माहितीपटाला सर्वोत्तम डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म म्हणून गौरवण्यात आलं. यामध्ये एका अनाथ हत्तीच्या बाळाच्या संगोपनाची गोष्ट आहे. (Photo: Netflix) -
A Journey with Elephants
या चित्रपटामध्ये एक १३ वर्षांचा अनाथ मुलगा त्याच्या मावशीबरोबर राहण्यासाठी आफ्रिकेत जातो आणि एका हत्तीला शिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवल्यानंतर त्याच्याशी मैत्री करतो. पुढे ते हत्तींच्या शिकारी थांबवण्यासाठी एकत्र मिळून काम करतात. (Photo: IMDb) -
हाथी मेरे साथी (Haathi Mere Saathi)
बॉलिवूडमध्ये हत्ती आणि माणसाच्या नात्यावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, त्यापैकी ‘हाथी मेरे साथी’ हा सर्वात प्रसिद्ध आहे. 1971 मध्ये आलेला हा चित्रपट, राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या मुख्य भूमिका असलेला, माणूस आणि हत्तीमधील भावनिक नाते दाखवतो. (Photo: Youtube) -
Junglee
याव्यतिरिक्त विद्यत जामवाल अभिनीत ‘जंगली’ (Junglee) सारख्या चित्रपटांमध्येही हत्ती आणि माणसाच्या नात्याचे चित्रण आहे. (Photo: Youtube) हेही पाहा- ‘या’ भारतीय कंपनीच्या छोट्या शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात लाखाचे बनले कोटी…
हत्ती आणि माणसातील भावनिक नात्याचे बंध उलगडणारे ८ चित्रपट
सध्या महाराष्ट्रासह सबंध देशामध्ये महादेवी हत्ती प्रकरण खूप चर्चेत आहे. जगभरातील अनेक चित्रपटांमध्ये इतर प्राण्यांसह हत्ती आणि माणसातील घट्ट नातंही दाखवण्यात आलं आहे.
Web Title: Operation dumbo drop to haathi mere saathi 8 films that explore the emotional bond between elephants and humans spl