-
हे चित्रपट मराठी चित्रपटांचे रिमेक आहेत
आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड चित्रपटांबद्दल सांगत आहोत जे मराठी चित्रपटांवर आधारीत आहेत. यापैकी एका चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. (Photo: Movie Screenshots) -
पोस्टर बॉईज
श्रेयस तळपदेचा २०१७ मध्ये आलेला ‘पोस्टर बॉईज’ हा चित्रपट पोस्टर बॉईज या मराठी चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. तुम्ही हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहू शकता. (Photo: Movie Screenshot) -
गोलमाल रिटर्न्स
रोहित शेट्टीचा २००८ मध्ये आलेला गोलमाल रिटर्न्स हा चित्रपट फेका-फेकी या मराठी चित्रपटावर आधारीत आहे. गोलमाल रिटर्न्सने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिक कमाई केली. (Photo: Movie Screenshot) -
हे बेबी
अक्षय कुमार, फरदीन खान, विद्या बालन आणि रितेश देशमुख यांचा ‘हे बेबी’ हा चित्रपट ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ या मराठी चित्रपटावर आधारीत रिमेक आहे. हे बेबीने बॉक्स ऑफिसवर सुमारे ४७ कोटींची कमाई केली. (Photo: Movie Screenshot) -
भागम भाग
२००६ मध्ये आलेला ‘भागम भाग’ हा मराठी चित्रपट ‘बिंदास्त’वर आधारीत रिमेक होता. भागम भाग चे IMDb रेटिंग ६.७ आहे. (Photo: Movie Screenshot) -
टार्जन द वंडर कार
अजय देवगणचा ‘टार्जन द वंडर कार’ हा चित्रपट ‘एक गाडी बाकी अनाडी’ या मराठी चित्रपटाच्या कथानकावरचा रिमेक आहे. तुम्ही जिओ हॉटस्टारवर ‘टार्जन द वंडर कार’ पाहू शकता. (Photo: Movie Screenshot) -
अंतिम
सलमान खान स्टारर अंतिम हा चित्रपट सुपरहिट मुळशी पॅटर्नचा ऑफिशियल रिमेक आहे. ‘अंतिम’ मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत, तर महिमा मकवाना आणि जिषु सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Photo: Movie Screenshot) -
धडक
‘धडक’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. (Photo: Movie Screenshot) -
दम लगा के हईशा
२०१५ मध्ये आलेला ‘दम लगा के हैशा’ हा मराठी चित्रपट ‘अगडबम’च्या कथेवर आधारीत रिमेक आहे. दम लगा के हैशा या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार व त्यातील ‘मोह मोह के धागे’ या गाण्यासाठी गायक मोनाली ठाकूर व गीतकार वरुण ग्रोवर यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (Photo: Movie Screenshot) हेही पाहा- “कुठे तरी पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासाचा आनंद घेणं…”; तेजस्विनी लोणारीचं श्रावण सोमवारी महादेव दर्शन, व्यक्त केल्या भावना
सुपरहिट मराठी चित्रपटांवर आधारीत ८ बॉलिवूड सिनेमे, एकाला तीन राष्ट्रीय पुरस्कार; तुम्ही पाहिलेत का?
आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड चित्रपटांची नावे सांगत आहोत जे मराठी चित्रपटांचे रिमेक आहेत. या चित्रपटांपैकी एक चित्रपट असा आहे ज्याला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
Web Title: Antim dhadak to poster boys bollywood movies based on popular marathi films remakes one won the national award spl