-

जयंत वाडकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्याबद्दल वक्तव्य केले. जयंत वाडकर म्हणाले, “सचिन सर उत्तम माणूस आहेत. ‘आयत्या घरात घरोबा’मध्ये मी त्यांच्याबरोबर पहिलं काम केलं. (फोटो सौजन्य: जयंत वाडकर इन्स्टाग्राम)
-
‘आमच्यासारखे आम्हीच’मध्ये होतो; पण सिनेमातला तो ट्रॅक कट झाला. त्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये काम केलं. तो सिनेमा आजही हिट आहे. त्याचा दुसरा भागही चांगला चालला. ते खूप उत्साही आणि सकारात्मक आहेत.” (फोटो सौजन्य: जयंत वाडकर इन्स्टाग्राम)
-
पुढे अशोक सराफ यांच्याबाबत जयंत वाडकर म्हणाले, “अशोकमामा म्हणजे कठोर शिस्तीचे. डायलॉग म्हणताना अचानक दुसरी वाक्यं म्हणायची नाहीत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
आम्ही त्यांना सांगून, रिहर्सल करूनच मग ती घ्यायचो.आजही ते कामाच्या ठिकाणी शिस्त पाळतात. “(फोटो सौजन्य: जयंत वाडकर इन्स्टाग्राम)
-
शूटिंगच्या आधी अर्धा-एक तास येऊन, ते डायलॉगचे मनन करीत असतात.”
-
दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना जयंत वाडकर यांनी, “‘तुझ्यावाचून करमेना’ हा मी पहिला चित्रपट केला. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोकमामा, अलका कुबल हे सगळेच कलाकार होते.” (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
“मी, राजन ताम्हाणे, विजय पाटकर, अजित सातभाई, वर्षा उसगांवकर आमची सगळ्यांची पहिली फिल्म होती. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
“त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट गेली की, ते आमच्यासारख्या कलाकारांची नावे सुचवायचे. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रत्येक चित्रपटात होतो. आमचं ट्युनिंग चांगलं होतं. त्यामुळे सीन करताना मजा यायची. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
“‘चिकट नवरा’, ‘कुठं कुठं शोधू मी तिला’, ‘सुना येती घरा’, ‘हमाल दे धमाल’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, अशा अनेक चित्रपटांत आम्ही एकत्र काम केलं आहे. आज लक्ष्मीकांत असते, तर आम्ही आज वेगळ्या स्थानी असतो. लक्ष्मीकांत नक्कीच निर्माता झाला असता. मला आजही त्यांची आठवण येते”, या शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
“लक्ष्मीकांत बेर्डे असते, तर आम्ही आज वेगळ्या स्थानी असतो”, जयंत वाडकर काय म्हणाले?
Jayant Wadkar on late actor Laxmikant Berde and Ashok Saraf: जयंत वाडकर यांनी सांगितला अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाले…
Web Title: Jayant wadkar on late actor laxmikant berde says if he had been alive we would be in a different place also shares experience of working with ashok saraf nsp