-
शुक्रवार २२ ऑगस्टपासून वीकेंडला ओटीटीवर रोमांचक चित्रपट व वेब सिरीजची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये काजोलचा भयपट ‘माँ’ ते राखी गुलजार यांच्या कमाल अभिनयाने नटलेला ‘आमार बॉस’चा समावेश आहे.
-
माँ (नेटफ्लिक्स): माँ हा विशाल फुरिया दिग्दर्शित एक पौराणिक भयपट आहे आणि यात काजोल, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरिन शर्मा यांच्यासह इतर कलाकार आहेत.
-
अमार बॉस (ZEE5): राखी गुलजार, शिबोप्रसाद मुखर्जी आणि श्रावंती चॅटर्जी अभिनीत हा बंगाली चित्रपट ४० वर्षीय कार्पोरेट कंपनीचा मालक अनिमेशबद्दल आहे, जेव्हा त्याची आई शुभ्रा हृदय शस्त्रक्रियेतून बरी झाल्यानंतर इंटर्न म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये रुजू होते, तेव्हा त्याला आव्हानांचा सामना करावा लागतो.
-
पीसमेकर सीझन २ (JioHotstar): जॉन सीना, डॅनिएल ब्रूक्स, फ्रेडी स्ट्रोमा, जेनिफर हॉलंड, फ्रँक ग्रिलो, टिम मीडोज, मायकेल रुकर आणि इतर कलाकार एका भावनिक, मल्टीव्हर्स-स्पॅनिंग परिघामध्ये दिसतील जे थेट नवीन डीसीयूशी जोडलेले आहे.
-
थलाईवन थलाईवी (अमेझॉन प्राइम व्हिडिओ): विजय सेतुपती आणि नित्या मेनेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा तमिळ कौटुंबिक चित्रपट आहे. यामध्ये एका जोडप्याचे नाते दाखवले आहे जे किरकोळ वाद आणि जवळजवळ घटस्फोटाच्या टप्प्यात पोहोचले पाहायला मिळते.
-
शोध (ZEE5): शोध हा एक रोमांचक थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये एका वकिलाने त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उलगडले आहे.
-
Maareesan (Netflix): Mamannan च्या यशानंतर, Vadivelu आणि Fahad Faasil हे सुधीश शंकर दिग्दर्शित Maareesan या तमिळ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हेही पाहा- पहिली नोकरी करणाऱ्यांनी पीएफ खात्यासंबंधी ‘ही’ गोष्ट कटाक्षानं पाळा; दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं
काजोलचा ‘माँ’ ते राखी गुलजारांचा ‘अमार बॉस’; २२ ऑगस्टपासून ओटीटीवर मनोरंजन करतील ‘हे’ सिनेमे अन् वेब सिरीज…
Ott release on august 22: या शुक्रवारी ओटीटीवर काही रोमांचक असे सिनेमे व वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत.
Web Title: Ott releases on august 22 from maa to aamar boss new movies and series to watch on netflix amazon prime video jiohotstar and more spl