• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar swears by one diet rule promises no diseases will come near you know why he have fasts every monday nsp

अक्षय कुमार करतो दर सोमवारी उपवास; काय आहे कारण? खुलासा करत म्हणाला, “९ ते १० च्या दरम्यान…”

Akshay Kumar reveals reason behind eating early dinner: “माझ्या दिनचर्येत…”, अक्षय कुमारने सांगितले फिटनेसचे सिक्रेट, म्हणाला…

Updated: August 24, 2025 13:30 IST
Follow Us
  • अभिनयाबरोबरच अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी आणि त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करणे, व्यायामाकडे लक्ष देणे, आहाराकडे लक्ष देणे या गोष्टींबाबत बॉलीवूडच्या खिलाडी कुमारने अनेकदा वक्तव्य केले.
    1/9

    अभिनयाबरोबरच अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी आणि त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करणे, व्यायामाकडे लक्ष देणे, आहाराकडे लक्ष देणे या गोष्टींबाबत बॉलीवूडच्या खिलाडी कुमारने अनेकदा वक्तव्य केले.

  • 2/9

    आता अभिनेत्याने ‘युवर बॉडी ऑलरेडी नोज’ (Your Body Already Knows) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्याने त्याच्या डाएटबद्दल, तसेच तो सायंकाळी साडे सहाच्या अगोदर सर्वांनी जेवले पाहिजे यावर भर का देतो, यावर वक्तव्य केले.

  • 3/9

    अभिनेता म्हणाला, “सायंकाळी लवकर जेवण करणे गरजेचे आहे. ते तुमच्या शरीरासाठी गरजेचे असते, कारण जेव्हा आपण रात्री झोपण्यासाठी जातो, त्यावेळी आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव म्हणजेच डोळे, हात, पाय आराम करत असतात. पण, फक्त आपले पोट आराम करू शकत नाही, कारण आपण उशिरा जेवलेलो असतो.”

  • 4/9

    पुढे अभिनेता म्हणाला, “उशिरा जेवल्यामुळे असे होते की जेव्हा तुम्ही उठता, त्यावेळी पोटाच्या आरामाची वेळ होते. पण, आपण उठल्यानंतर लगेच नाश्ता करतो आणि बिचाऱ्या पोटाला पुन्हा काम करावे लागते. मी हे खूप सोप्या पद्धतीने स्पष्ट करत आहे. तुम्हा सगळ्यांनाच हे माहीत आहे की सगळे आजार हे पोटापासूनच सुरू होतात.”

  • 5/9

    “जर तुम्ही वेळेत, लवकर जेवण केले तर आजार तुमच्या आसपासही येणार नाहीत. हेच मीदेखील माझ्या दिनचर्येत पाळतो. त्यामुळे तुम्ही सायंकाळी साडे सहापर्यंत तुमचा आहार घेतला पाहिजे, जेवले पाहिजे. त्यामुळे वेळेत पचन होईल. जेव्हा तुम्ही ९ ते १० च्या दरम्यान झोपण्यास जाल, त्यावेळी तुमचे पोटही आराम करण्यासाठी तयार असेल, ही खूप सोपी गोष्ट आहे.”

  • 6/9

    तसेच अक्षय कुमारने असाही खुलासा केला की दर सोमवारी तो उपवास करतो. अक्षय म्हणाला, “मी रविवारी संध्याकाळी जेवतो, त्यानंतर सोमवारी मी काहीही खात नाही, थेट मंगळवारी सकाळी मी जेवण करतो.”

  • 7/9

    तो कोणत्या पद्धतीचे व्यायाम करतो, यावर अक्षय म्हणाला, “मी रॉक क्लायबिंग करतो. मी वजन उचलत नाही. मला विविध खेळ खेळायला आवडतात. जीममध्ये व्यायाम करताना मी वजन उचलत नाही.”

  • 8/9

    पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील अक्षय कुमारच्या संभाषणाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अक्षय कुमार शिस्तबद्ध आयुष्य जगत असल्याचे म्हटले आहे.

  • 9/9

    दरम्यान, अक्षय कुमार लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Akshay kumar swears by one diet rule promises no diseases will come near you know why he have fasts every monday nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.