-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बाप्पाच्या विसर्जनाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने यंदा स्वत:च्या हातांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारली होती. त्याच बाप्पाला आज निरोप दिला जात आहे.
-
लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचे काही भावुक क्षण सोनालीने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
-
सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे.
-
इतकंच नव्हे तर सोनालीचा नवरा कुणालही या विसर्जनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘गणपती चालले गावाला… चैन पडे ना आम्हाला…; पुढच्या वर्षी लवकर या…’ अशी कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहेत.
-
बाप्पाच्या निरोपाच्या क्षणांसह तिच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेल्या पाहुण्यांचे फोटोसुद्धा सोनालीने शेअर केले आहेत.
-
सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रार्थना बेहेरे, सिद्धार्थ जाधव तसंच कुटुंबीय पाहायला मिळतं आहे. (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
पुढच्या वर्षी लवकर या… सोनाली कुलकर्णीने लाडक्या बाप्पाला दिला निरोप, नवरा कुणालचीही खास उपस्थिती
सोनाली कुलकर्णीचा घरच्या बाप्पाला निरोप, नवरा कुणाल आणि कुटुंबीयांचे खास फोटो केले शेअर
Web Title: Marathi actress sonalee kulkarni shares ganpati visarjan photos on social media ssm 00