-
‘नांदा सौख्यभरे’, ‘मंगळसूत्र’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. तिला मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. साधारण दोन वर्षांपूर्वी ऋतुजाने ठाण्यात स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं होतं. हक्काचं घर घेतल्यावर आता ऋतुजा बिझनेसवुमन झाली आहे.
-
ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत काही दिवसांपूर्वीच एक नवीन सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं असून त्याचं नाव आहे ‘फूडचं पाऊल’.
-
यंदा जुलै महिन्यात ऋतुजाच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी देखील उपस्थित होती.
-
ऋतुजाने तिच्या याच नवीन रेस्टॉरंटमध्ये तिचा यंदाचा वाढदिवस साजरा केला.
-
९ सप्टेंबरला ऋतुजाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेत्रीचे जवळचे मित्रमंडळी तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तिच्या ‘फूडचं पाऊल’ रेस्टॉरंटमध्ये आले होते.
-
यावेळी सर्वात आधी ऋतुजाच्या आईने तिचं औक्षण केल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
औक्षण केल्यावर ऋतुजाने मोठ्या उत्साहात वाढदिवसाचा केक कापला. यावेळी मराठी सिनेविश्वातील तिचे जवळचे मित्रमंडळी देखील या सेलिब्रेशनला उपस्थित होते.
-
याशिवाय इंडस्ट्रीमधील असंख्य मित्रमंडळींनी ऋतुजाला वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. “९.९.२०२५ खरोखरंच लक्षात राहणारा दिवस…मला मिळालेल्या प्रेमाबद्दल, आशीर्वादांबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे” असं कॅप्शन ऋतुजाने तिच्या बर्थडे फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, ऋतुजाने बर्थडेसाठी खास वेस्टर्न लूक केला होता. फिकट जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. ( सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा बागवे इन्स्टाग्राम )
आधी घेतलं हक्काचं घर, आता झाली बिझनेसवुमन! मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या नवीन रेस्टॉरंटमध्ये ‘असा’ साजरा केला वाढदिवस
Photos : मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या नव्या रेस्टॉरंटमध्ये साजरा केला वाढदिवस, शेअर केले सुंदर फोटो, पाहा…
Web Title: Marathi actress rutuja bagwe celebrate birthday in her own restaurant shares photos sva 00