• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is mahieka sharma know all about hardik pandyas rumoured 24 year old girlfriend see her viral photos kvg

Who is Mahieka Sharma: हार्दिक पांड्याचे २४ वर्षीय मॉडेल माहिका शर्माशी सूत जुळले; माहिकाने पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात केले होते काम

Who is Mahieka Sharma Rumoured Girlfriend of Hardik Pandya: पत्नी नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट, त्यानंतर गर्लफ्रेंड जास्मिन वालियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. मॉडेल माहिका शर्माशी त्याचे सूत जुळल्याची अफवा सोशल मीडियावर उडाली आहे.

Updated: October 11, 2025 23:10 IST
Follow Us
  • CRICKETER HARDIK PANDYA
    1/13

    भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या खेळाएवढाच मैदानाबाहेरील वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत असतो.

  • 2/13

    पत्नी नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या तरूणींची नेहमीच चर्चा होत असते. नुकतेच गर्लफ्रेंड जास्मिन वालियाबरोबर त्याचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते.

  • 3/13

    आता मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्माबरोबर हार्दिक पांड्या डेट करत असल्याची चर्चा आहे.

  • 4/13

    नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचे नाव युकेमधील गायिका जॅस्मिन वालियाशी जोडले गेले होते. मात्र दोघांनी आपल्या नात्याची कधीही जाहीर वाच्यता केली नाही. मात्र दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते.

  • 5/13

    मॉडेल माहिका शर्माच्या एका सेल्फीमध्ये क्रिकेट हार्दिक पांड्या दिसत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. तसा एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

  • 6/13

    माहिका शर्माच्या मिरर सेल्फीमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या दिसत असल्याच्या अफवा आहेत. याशिवाय हे दोघे एकमेकांना इन्स्टाग्रामवरही फॉलो करतात.

  • 7/13

    माहिका शर्माच्या बोटांचाही एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पेनाने ३३ हा क्रमांक लिहिला गेला आहे. हार्दिक पांड्याच्या जर्सीचा क्रमांक हाच असल्यामुळे चर्चांना पेव फुटले आहे.

  • 8/13

    एवढेच नाही तर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचा एक वेगवेगळा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एकाच रंगाचा, पद्धतीचा बाथरोब परिधान केलेला दिसत आहे.

  • 9/13

    कोण आहे माहिका शर्मा?
    माहिका शर्मा मॉडेल आहे. तिने अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठी रॅम्प वॉक केलेला आहे. तसेच तिने संगीत व्हिडीओ आणि काही शॉर्फ फिल्म्समध्येही काम केले आहे.

  • 10/13

    २४ वर्षीय माहिका शर्माने तिचे प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमधून पूर्ण केले. तसेच गुजरातच्या गांधीनगर येथील दीनदयाल पेट्रोलियम विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र आणि वित्त या विषयांमध्ये कलाशाखेतून पदवी घेतली आहे.

  • 11/13

    शिक्षण पूर्ण केल्यानंतर माहिकाने मॉडेलिंग क्षेत्रात काम सुरू केले. आजवर तिने अनेक मोठ्या ब्रँडबरोबर काम केले आहे. तसेच तिला इंडियन फॅशन अवॉर्ड मॉडेल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

  • 12/13

    अभिनेता विवेक ओबेरॉयच्या ‘नरेंद्र मोदी’ (२०१९) या चित्रपटात तिने लहानशी भूमिकाही केली आहे. याशिवाय काही जाहिरातींमध्येही तिने अभिनय केलेला आहे.

  • 13/13

    अनिता डोंगरे, रितू कुमार, तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा ​​आणि अमित अग्रवाल यांसारख्या आघाडीच्या डिझायनर्ससाठी माहिका शर्माने मॉडलिंग केले आहे.

TOPICS
क्रिकेटCricketमनोरंजन बातम्याEntertainment Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Who is mahieka sharma know all about hardik pandyas rumoured 24 year old girlfriend see her viral photos kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.