-
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. या सोहळ्यात यंदा महाराष्ट्रातील चार बालकलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘नाळ २’ मध्ये साकारलेल्या चिमी या भूमिकेसाठी चिमुकल्या त्रिशा ठोसरला देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चिमुकल्या त्रिशा ठोसरची चर्चा सुरू आहे.
-
ही चिमुकली अवघ्या ६ वर्षांची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्रिशा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर साडी नेसून गेली होती.
-
त्रिशाच्या पारंपरिक लूकचं सर्वांनीच कौतुक केलं. मात्र, या सोहळ्यात तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. ही चिमुकली न घाबरता मंचावर गेली. यानंतर तिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहात उपस्थित मान्यवरांना अभिवादन केलं. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड स्टार्स सुद्धा उपस्थित होते. ( प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व त्रिशा यांचा फोटो )
-
त्रिशाने सोहळा संपल्यावर बॉलीवूडच्या किंग खानची भेट घेतली. शाहरुखने सुद्धा या चिमुकलीला भरभरून शुभेच्छा दिल्या. खरंतर, शाहरुख आणि राणी हे दोघंही त्रिशा पुरस्कार स्वीकारत असताना तिच्याकडे अभिमानाने पाहत होते आणि टाळ्या वाजवून तिचं कौतुक करत होते.
-
त्रिशाने राणी मुखर्जीची सुद्धा या कार्यक्रमात भेट घेतली.
-
अभिनेता विक्रांत मॅसीबरोबर देखील त्रिशाने खास फोटो शेअर केला आहे.
-
यंदाचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्याबरोबर सुद्धा त्रिशाने खास फोटो काढला आहे.
-
हे सगळे फोटो त्रिशाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी सुद्धा या फोटोवर कमेंट करत तिला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहे. ( सर्व फोटो सौजन्य : त्रिशा ठोसर इन्स्टाग्राम)
सुंदर साडी, चेहऱ्यावर निरागस भाव…; ६ वर्षांच्या त्रिशाचं बॉलीवूडकरांनी केलं कौतुक, शाहरुखसह ‘या’ स्टार्सना भेटली चिमुकली, पाहा…
राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार त्रिशा ठोसरने ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींसह शेअर केले Cute फोटो
Web Title: Child actor treesha thosar meet shah rukh khan and other bollywood stars shares cute photos sva 00