-
सैराट फेम रिंकू राजगुरुने नवा लूक केला आहे.
-
तिने स्टायलिश लूक करत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये प्रेक्षकांची लाडकी आर्ची अतिशय सुंदर दिसते आहे.
-
रिंकूने यावेळी पांढरा शर्ट व त्यावर निळ्या व पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेली मिडी परिधान केली आहे.
-
या खास लूकमध्ये रिंकूने इमारतीच्या गच्चीवर जात बहारदार फोटोशूट केलंय.
-
यावेळी रिंकूने केस मोकळे ठेवले आहेत तर कानामध्ये रिंगही घातले आहेत. या फोटोंना तिने ‘Listen,when the eyes talk’, असं कॅप्शन दिलंय.
-
दरम्यान, रिंकूच्या या फोटोंना पाहून अभिनेत्री अमृता खानविलकरने खास कमेंट केली आहे. तिने लिहिलंय “The eyes chico the eyes” तर अनेकांना रिंकूचे डोळे पाहून दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचीही आठवण आलीय, एका चाहत्याने “तुझ्या डोळ्यांकडे पाहतो तेव्हा मला स्मिता पाटलांची आठवण येते”, अशी खास कमेंट केलीय.
-
दरम्यान काही दिवसांआधी रिंकूने हे फोटोशूट केलं होत. यामध्ये तिने दाक्षिणात्य लूक साकारला होता. या लूकमध्येही रिंकू नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसत आहे.
-
सर्व फोटो साभार रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम
“तुझ्या डोळ्यांकडे…”; रिंकू राजगुरूला नव्या लूकमध्ये पाहून चाहत्यांना दिग्गज अभिनेत्रीची आठवण, अमृता खानविलकरचीही खास कमेंट
रिंकूने यावेळी पांढरा शर्ट व त्यावर निळ्या व पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेली मिडी परिधान केली आहे.
Web Title: Sairat actress rinku rajguru white shirt and blue midi dress stylish photoshoot smita patil spl