-
Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीचा आज आठवा दिवस आहे. आठव्या दिवशी महागौरीची पूजा-आराधना केली जाते.
-
आजचा रंग आहे मोरपंखी (Peacock Green Colour). हा रंग सद्भावना, सुंदरता, समृध्दी याचे प्रतीक आहे.
-
मराठी अभिनेत्री दीपा परब चौधरीने (Deepa Parab Chaudhari) शारदीय नवरात्रीनिमित्त साडीत फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीपाने मोरपंखी रंगाची सुंदर साडी (Peacock Green Saree) नेसली आहे.
-
घराच्या बाल्कनीत दीपाने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिल्या आहेत.
-
दीपाने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे.
-
दीपा लवकरच संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘फकिरीयत’ (Fakireeyat Movie) या चित्रपटात दिसणार आहे.
-
‘फकिरीयत’ या चित्रपटात बाबाजींच्या एका शिष्येच्या माध्यमातून या चित्रपटाची कथा उलगडत जाणार आहे, जी आपले जीवन गुरु इच्छेने जगते, गुरुकार्य जीवनाचे ध्येय समजते, तिला होणारी दैवी दर्शने, येणारे आदेश, होणारा विरोध, तिचा संघर्ष अशा अनेक अद्भुत, अविश्वनीय, रहस्यमय घटना अशी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : दीपा चौधरी/इन्स्टाग्राम (हेही पाहा : ‘छबी’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अनघा भगरेचा पांढऱ्या साडीतील अंदाज)
Navratri 2025: घराच्या बाल्कनीत दीपा चौधरीचं मोरपंखी रंगाच्या साडीत फोटोशूट
मोरपंखी रंग सद्भावना, सुंदरता, समृध्दी याचे प्रतीक आहे.
Web Title: Shardiya navratri 2025 actress deepa parab chaudhari peacock green saree house balcony sdn