-
नवरात्रीचा सण रंग, भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाने साजरा होत असताना अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने एक वेगळाच उपक्रम हाती घेतला आहे.
-
तिने नवरात्रीच्या प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार भारतातील आठ प्रेरणादायी महिलांचा लूक साकारून चाहत्यांची मने जिंकली.
-
पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगात तिने भारतरत्न लता मंगेशकर यांचा लूक केला आणि संगीताला आदरांजली वाहिली.
-
दुसऱ्या दिवशी लाल रंगात सावित्रीबाई फुले यांच्या रूपात अवतरून शिक्षण व स्त्रीशक्तीचा संदेश दिला.
-
तिसऱ्या दिवशी निळ्या रंगात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या रूपातून मातृत्व आणि सेवा भावनेचा सन्मान केला.
-
चौथ्या दिवशी पिवळ्या रंगात भारूडकार चंदाताई तिवडी यांचा लूक करीत लोककलेची परंपरा उजळली.
-
पाचव्या दिवशी हिरव्या रंगात जुनी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या रूपात झळकली.
-
सहाव्या दिवशी राखाडी रंगात समाजसेविका व लेखिका सुधा मूर्ती यांचा लूक करून ज्ञान, साधेपणा व दानशीलतेचा संदेश दिला.
-
सातव्या दिवशी नारिंगी रंगात महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचे दर्शन घडवले.
-
नवव्या दिवशी गुलाबी रंगात संत कान्होपात्रा यांच्या भक्तिरसात रंगून नवरात्री उपक्रमाची सांगता केली.
(सर्व फोटो सौजन्य :अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
Photos : महाराणी ताराराणी ते सुधामूर्ती अश्विनी महांगडेची नवरात्रीत प्रेरणादायी महिलांना अनोखी आदरांजली
Marathi actress ashvini mahangade: नवरात्रीत प्रत्येक रंगानुसार अश्विनी महांगडे हिने नऊ थोर महिलांचा लूक साकारला आहे.
Web Title: Marathi actress ashvini mahangade navratri 2025 inspirational woman look photoshoot viral svk 05